Pune Crime news Saam Tv
क्राईम

Gadchiroli News: आठ दिवसांवर होतं लग्न, बदनामीपासून वाचण्यासाठी जन्मदात्रीने नवजात बाळाला संपवलं; परिसरात खळबळ

Gadchiroli Crime News : आठ दिवसांवर लग्न ठरलेले असताना लग्नाआधी जन्मलेल्या बाळामुळे आपली बदनामी होईल, या भीतीने जन्मदातीनेच अर्भकाचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना आहे.

Vishal Gangurde

मंगेश भांडेकर, गडचिरोली

Gadchiroli Crime News :

गडचिरोलीतून धक्कादायक वृत्त हाती आली आहे. आठ दिवसांवर लग्न ठरलेले असताना लग्नाआधी जन्मलेल्या बाळामुळे आपली बदनामी होईल, या भीतीने जन्मदातीनेच अर्भकाचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना आहे. गडचिरोली शहरात हा प्रकार घडला आहे. या युवतीला गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवतीचे गडचिरोलीतील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचीही जात वेगवेगळी असल्याने आधी कुटुंबाचा विरोध होता. मात्र कुटुंबाने होकार दिल्यानंतर दोघांनीही लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

21 जानेवारीचा लग्न मुहूर्त ठरलेला होता. परंतु एका लग्न समारंभासाठी नियोजित वधू वराच्या घरी आली आणि तिची प्रसूती झाली. पोलिसांनी युवतीला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीनंतर तिची प्रसूती झाल्याचे निष्पन्न झाले.

अर्भक नियोजित पतीपासून जन्मलेला आहे का की इतर कुणाचा हे डीएनए चाचणीतून सिद्ध होणार आहे. अर्भक हत्या प्रकरणात नियोजित वराचाही सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

बारा सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोराला अटक

बारा सोनसाखळी चोरी करणारा आणि मोक्का लावण्यात आलेला फरार असलेल्या आरोपीला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. सहजाद मोहम्मद शाह उर्फ संजू असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अंबरनाथच्या एम पी गेट समोर संजू येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पिंट्या थोरवे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा वाचून शहजाद मोहम्मद शहा याला ताब्यात घेतले.

आरोपीकडून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून बारा गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपीकडून दीड लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत, याप्रकरणी उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party Case: मोठी अपडेट! एप्रिल-मे महिन्यातही त्याच हॉटेलमध्ये झाली होती पार्टी; कोण- कोण होत होणार तपास

Maharashtra Live News Update: मुख्य निरीक्षण अधिकारी 1.75 लाखांची लाच घेताना ACB च्या सापळ्यात अडकला

Honey Trap: नाशिकनंतर साताऱ्यातही हनी ट्रॅप? 2 माजी मंत्री, मंत्र्याचा मुलगा हनी ट्रॅपमध्ये?

Accident : भाजप आमदाराच्या आश्रमशाळेत भीषण अपघात, पाण्याची टाकी कोसळून १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Emergency Landing : ५००० फूटावर विमानाचं इंजिन बिघडलं; बोईंग ड्रीमलाइनरचं इमर्जन्सी लँडिग, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT