Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam TV

Nagpur Crime News: नागपूर पोलिसांची धडक कारवाई; ५० लाखांच्या गांजासह ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News: ट्रकमध्ये छुप्या पद्धतीने तयार केलेल्या कप्प्यामध्ये सुमारे 495 किलो गांजा लपवून ठेवल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी पोलिसांनी शब्बीर खान आणि मुनव्वर खान अशा दोन आरोपींना अटक केली आहे.
Published on

Nagpur News:

नागपुरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चंद्रपूर नागपूर मार्गावर गांजाने भरलेला कंटेनर जप्त केला आहे. तब्बाल ५० लाखांच्या गांजा पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे.

Nagpur Crime News
Nagpur News: सख्खा भाऊच बनला पक्का वैरी, पैशाच्या वादातून मोठ्या भावाची हत्या; ७ महिन्यानंतर घटनेचा उलगडा

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज पहाटे चंद्रपूर नागपूर मार्गावरून ट्रक निघाला होता. यावेळी पोलिसांना ट्रकमध्ये गांजा लपवून नेत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून ५० लाखांच्या गांजासह ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चालकाच्या कॅबिनमध्ये वेगळा कप्पा तयार करून हा गांजा लपवून नेला जात होता. आज पहाटेच पोलिसांनी हा ट्रक थांबवत तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये छुप्या पद्धतीने तयार केलेल्या कप्प्यामध्ये सुमारे 495 किलो गांजा लपवून ठेवल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी पोलिसांनी शब्बीर खान आणि मुनव्वर खान अशा दोन आरोपींना अटक केली आहे.

मुंबईमध्ये देखील आज सकाळी अमली पदार्थांप्रकरणी पोलिसांनी एका नायजेरियन तरुणाला अटक केली. मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी हा नायजेरियन तरुण आला होता. वाकोला पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अँथोनी मादुका न्वायझे (32 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून 55 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या कोकोनची बाजारभावातील अंदाजे किंमत 55 लाख रुपये इतकी आहे.

Nagpur Crime News
Beed Crime News: स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; संशयित 2 महिलांना चौकशीसाठी घेतले ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com