Illegally Selling Alexandrine Parrots Saam Tv
क्राईम

Crime News: पहाडी पोपटांची बेकायदेशीर विक्री, वन विभागाने सापळा रचून केली तिघांना अटक

Illegally Selling Alexandrine Parrots: पुणे शहरात अलेक्झांड्रिन पोपटांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी वन विभागाने सापळा रचून तिघांना अटक केली आहे.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

Pune Crime News

पुणे शहरात (Pune) अलेक्झांड्रिन पोपटांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी वन विभागाने सापळा रचून तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तींच्या ताब्यातून दोन पोपट जप्त करण्यात आले आहेत. पुण्यातील औंध येथील लोहिया आयटी पार्कजवळ ही कारवाई करण्यात आली.  (Latest Crime News)

वन विभागाने रविवारी (31 मार्च) ही कारवाई केली आहे. पियुष पासलकर, यश कानगुडे आणि सौरव झोरे असे गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. वन विभागाला अलेक्झांड्रिन पोपटांची बेकायदेशीर विक्री होत (Illegally Selling Alexandrine Parrots) असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय,

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वन अधिकाऱ्यांना औंध परिसरात तीन तरुण अलेक्झांड्रिन पोपटांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी योजना (Pune Crime) आखली. योजनेनुसार बनावट ग्राहक बनून सापळा रचण्यात आला. बेकायदेशीररीत्या पोपटांची विक्री करताना या तिघांना अटक करण्यात आली.

अलेक्झांड्रिन पोपट कुठे सापडले जातात

अलेक्झांड्रिन पोपट हा राजस्थान, जम्मू-काश्मीरसह डोंगराळ प्रदेश आढळतो. या पोपटाला ‘पहाडी’ पोपट म्हणूनही ओळखलं जातं. वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत परिशिष्ट दोन नुसार देशी पोपट (crime news) बाळगणे, विक्री करणे, शिकार करणे हा गुन्हा आहे. याच गुन्ह्याखाली या तिघांना अटक करण्यात आली आहे.

अलेक्झांड्रिन पोपट हा हुबेहुब नक्कल करण्यासाठी ओळखला जातो. पोपट त्याच्या मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्त्वामुळे आणि सामाजिक वर्तनामुळे पाळीव प्राणी म्हणून पाळण्यासाठी प्रसिद्ध आहे. या पोपटाची प्रत्येक शब्द शिकण्याची जलद क्षमता (Alexandrine Parrots) आहे. त्यामुळे त्यांना बोलणं शिकवण्यात जास्त वेळ घालवण्याची गरज येत नाही. दररोज जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटे संभाषण केल्यानंतर लगेच हा पक्षी बोलण्यात तरबेज होतो. त्यामुळे त्याला जास्त पसंती दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: संतापजनक! गायिकेवर सामूहिक बलात्कार, खोटंनाटं सांगून लॉजवर बोलावून घेतलं अन्...

Hair Mask: किचनमधील 'या' ३ गोष्टींपासून बनवा हेअर मास्क, केस होतील मजबूत

Maharashtra Live News Update: अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवरायांचा फोटो असलेल्या बॅनर वरून नागरिकांमध्ये संताप

Tuesday Horoscope : आज सावध रहा… विश्वासूच देऊ शकतात धोका; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

No Handshake Ind vs Pak : पाकिस्तानला पराभव सहन झालाच नाही, रडगाणं सुरू; नो हँडशेक जिव्हारी लागल्यानं भारताची तक्रार

SCROLL FOR NEXT