Pune Crime News: पुण्यात चाललयं काय? देशी दारुच्या दुकानात राडा, डोक्यात फोडल्या बाटल्या; धक्कादायक CCTV समोर

Pune Crime News in Marathi: पुण्याच्या वाघोली भागात असलेल्या देशी दारूच्या दुकानात ३ ते ४ जणांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत एक पीएमपीएलचा कर्मचारीही असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Pune Crime News in Marathi:
Pune Crime News in Marathi:Saamtv

अक्षय बडवे, पुणे|ता. ३१ मार्च २०२४

Pune Crime News:

पुणे शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एफ.सी रोडवर कोयत्याने मारामारी झाल्याची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यामध्ये देशी दारुच्या दुकानात जोरदार हाणामारी झाल्याचीही घटना समोर आली आहे. (Crime News in Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या वाघोली भागात असलेल्या देशी दारूच्या दुकानात ३ ते ४ जणांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. वाघोली भागात असणाऱ्या केसनंद रोडवरील दुकानात घडलेल्या घटनेचा सीसीटिव्ही समोर आला असून यामध्ये दोघेजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत एक पीएमपीएलचा कर्मचारीही असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस चौकी पासून जवळच्या अंतरावर असलेल्या मुख्य चौकात एक देशी दारूचे दुकान आहे. शनिवारी संध्याकाळी तिथे काही जण मद्यपान करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले होते. या मध्ये एक पीएमपीएलचा कर्मचारीसुद्धा होता.

Pune Crime News in Marathi:
Punjab News: धक्कादायक! ऑनलाइन मागवलेला केक खाल्ल्याने मुलीचा वाढदिवसाच्या दिवशी मृत्यू

यादरम्यान त्यांच्यामध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाला आणि याचे रूपांतर जोरदार हाणामारीमध्ये झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये किरकोळ वादातून पीएमपीएलचा कर्मचारी आणि काही तरुणांमध्ये मारामारी झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी कंद पोलिसांकडून करण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime News in Marathi:
Praniti Shinde : भाजप उमेदवाराला एकच प्रश्न विचारा, त्यांची बोलती बंद होईल; प्रणिती शिंदे थेट बोलल्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com