प्रातिनिधिक फोटो Crime News
क्राईम

WhatsApp वरुन कोकेनची ऑर्डर, ड्रग्स खरेदी करताना महिला डॉक्टर अडकली पोलिसांच्या जाळ्यात

Crime News : व्हॉट्सॲपवरुन कोकन मागवणाऱ्या महिला डॉक्टरला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. कोकेनची पाकिट डिलीव्हरी एजंटकडून घेताना पोलिसांनी छापा मारत डॉक्टर आणि डिलीव्हरी एजंटला पकडले.

Yash Shirke

व्हॉट्सॲपवर कोकेनची खरेदी केल्याच्या आरोपाखाली ३४ वर्षीय महिला डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासोबत पोलिसांनी डिलीव्हरी एजंटला देखील पकडले आहे. त्यांच्याकडून ५३ ग्रॅम कोकन व्यतिरिक्त १०,००० रुपये रोख आणि दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहे. कोकेनची पाकिट देत असताना ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील हैदराबादमधील एका रुग्णालयाच्या सीईओ डॉ. नम्रता चिगुरुपती यांना कोकेन खरेदी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. डॉ. नम्रता मुंबईतील एका ड्रग्स सप्लायरकडून ५ लाख रुपयांचे कोकेन खरेदी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रायदुर्गम पोलिसांच्या पथकाने महिला डॉक्टर आणि डिलीव्हरी एजंटला रंगेहाथ पकडले.

८ मे रोजी ड्रग्स डिलीव्हरी एजंट एका रेस्टॉरंटजवळ डॉ. नम्रताला कोकेनचे पाकिट देण्यासाठी आला होता. ४ मे रोजी वंश धाकड नावाच्या ड्रग्स सप्लायरक़डून त्यांनी व्हॉट्सॲपवर ड्रग्स मागवले होते. यासाठी त्यांनी ५ लाख रुपये खर्च केले होते. धाकडचा सहकारी बालकृष्ण ड्रग्स पोहोचवत असताना पोलिसांनी दोघांना पकडले.

नम्रता आणि बालकृष्ण यांच्या विरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान नम्रता यांनी ड्रग्सच्या व्यसनाची कबुली दिली. मागील काही दिवसांत ड्रग्सवर तब्बल ७० लाख रुपये खर्च केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी वेंकन्ना यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Indurikar Maharaj Daughter Engagement Photos: किर्तनकार इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

WCD Recruitment: आनंदाची बातमी! महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

ईडीची सर्वात मोठी कारवाई; सुरेश रैना आणि शिखर धवनची कोट्यवधींची संपत्ती जप्त, क्रीडा विश्वात खळबळ

Crime: तरुणाने मैत्रिणीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरून कृष्णा नदीत फेकला; सांगली हादरली

SCROLL FOR NEXT