दादांच्या विमानाचं CCTV नाकारलं, 28 फेब्रुवारीआधी येणार अपघाताचा प्राथमिक अहवाल?

Ajit Pawar Aircraft Accident Preliminary Report Date: अजितदादांच्या अपघाताचं गूढ अद्याप कायम आहे... अशातच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं दादांच्या अपघाताआधीच्या CCTV फुटेजची माहिती देण्यास नकार दिलाय... त्यामुळे दादांच्या अपघातावरून नवा संशय व्यक्त करण्यात येतोय...
Civil Aviation Ministry refuses to share CCTV footage related to Ajit Pawar’s aircraft accident; questions intensify ahead of preliminary report.
Civil Aviation Ministry refuses to share CCTV footage related to Ajit Pawar’s aircraft accident; questions intensify ahead of preliminary report.Saam Tv
Published On

अपघात की घात..अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवरून सातत्यानं हा प्रश्न विचारला जातोय.....रोहित पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन या संशयाचं धुक वाढवलं असतानाच अजून एका घटना घडली आहे. बारामतीच्या नितीन यादव यांनी आरटीआयच्या माध्यमातून अजितदादांच्या अपघाताआधी मुंबई विमानतळावरील CCTV फुटेजची मागणी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे केली. मात्र 28 जानेवारीचे हे सीसीटिव्ही फुटेज देण्यास मंत्रालयानं नकार दिल्यानं संशयाचं धूक अधिक गडद झालयं...

विशेष म्हणजे, अजितदादांच्या अपघातानंतर मुंबई विमानतळासह देवगिरी बंगल्यावरील सीसीटीव्ही फुटेजही अद्याप समोर आलेले नाहीत... त्यामुळे अपघाताआधीचे अजित पवारांचे देवगिरी पासून विमानतळापर्यंतच्या प्रवासाचे CCTV सार्वजनिक करावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय..

दरम्यान विमान अपघाताची नियमांनुसार चौकशी सुरु असून AAIB तांत्रिक आणि पुराव्यांवर आधरित तपास करतेय... एकीकडे उच्च तापमानामुळे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचं नुकसान झालेलं असताना दुसरीकडे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीरीत्या डाउनलोड झाल्याचं नागरी हवाई मंत्रालयाने सांगितलयं......

आता 28 फेब्रुवारीपूर्वी अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर येणार आहे... त्यामुळे या प्राथमिक अहवालात नेमकी कोणती माहिती समोर येणार? दादांचं देवगिरी बंगल्यावरील आणि मुंबई विमानतळावरील सीसीटिव्ही फुटेज सार्वजनिकरित्या उघड केले जाणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर मिळणं आता राज्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com