बोगस रेशनकार्डचं रॅकेट, मुंबई पोलिसांची धडक कारवाई; 7 जण अटकेत, बांगलादेशी कनेक्शनचा संशय?

Mumbai Fake Ration Card Scam 2026 Detailed Report: मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी बोगस शिधापत्रिका तयार करून शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत 7 जणांना अटक करण्यात आली असून 340 बनावट शिधापत्रिका आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
Seized fake ration cards, laptops, and forged documents displayed after Dindoshi Police crackdown in Mumbai
Seized fake ration cards, laptops, and forged documents displayed after Dindoshi Police crackdown in MumbaiSaam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY), प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बनावट शिधापत्रिका तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा दिंडोशी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 340 बोगस शिधापत्रिका काही कागदपत्रे,एमआरआयडीचे बनावट अलॉटमेंट लेटर, 9 लॅपटॉप, 2 प्रिंटर तसेच 9 मोबाईल फोन जप्त केले आहेत

Seized fake ration cards, laptops, and forged documents displayed after Dindoshi Police crackdown in Mumbai
ठाणे, कल्याणमधून मुंबईला काही मिनिटांत पोहोचता येणार; मेट्रो १२ चा विस्तार होणार;कसा असेल मार्ग?

दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 19/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 319(2), 336(2), 338, 340(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी सापळा रचून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपासात इतर साथीदारांनाही अटक करण्यात आली.

Seized fake ration cards, laptops, and forged documents displayed after Dindoshi Police crackdown in Mumbai
Shocking : अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देणं पडलं महागात, तरुणाला भोगावा लागणार ३ वर्षाचा तुरुंगवास

पोलिसांनी आरोपींकडून 2000-09 या कालावधीतील बृहन्मुंबई झोपडपट्टी रहिवासी ओळखपत्र, 340 बनावट कागदपत्रे, एमआरआयडीचे बनावट अलॉटमेंट लेटर, 9 लॅपटॉप, 2 प्रिंटर तसेच 9 मोबाईल फोन जप्त केले आहेत. प्राथमिक तपासात आरोपी बनावट शिधापत्रिका व कागदपत्रांच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत असल्याचे समोर आले आहे. या टोळीने मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा संशय असून, इतर गुन्ह्यांशीही त्यांचा संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Seized fake ration cards, laptops, and forged documents displayed after Dindoshi Police crackdown in Mumbai
Bhiwandi Mayor: भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का, बंडखोर उमेदवार झाला महापौर; काँग्रेसने कसा दिला शह?

अटक मुख्य आरोपीचे नाव दयाल वय 29 वर्षे,राकेश सिंग वय 43 वर्षे,दिनेश कुमार केसारवाडी वय 40 वर्षे, एडवर्ड उर्फ सोनू डिसोजा वय 43 वर्षे, मनी संकर शर्मा वय 39 वर्षे, बिपिन कुमार पांडे वय 42 वर्षे, वीरू गुप्ता वीरू गुप्ता वय 31 वर्षे असून नेपाळ देशातील राहणारे नागरिक आहे. या आरोपीच्या टोळीमध्ये आणखी काही सदस्य आहेत का त्यासोबत या आरोपींनी मुंबई शहरात किती लोकांना बनावट राशन कार्ड विकला आहे यासंदर्भात दिंडोशी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com