अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीप्रकरणी आरोपी दोषी
नऊ वर्षांनंतर न्यायालयाचा निर्णय
तीन वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा
सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याने गुन्हा सिद्ध
नऊ वर्षांपूर्वी एका तरुणाने १६ वर्षांच्या मुलीला फ्लाईंग किस दिली होती. या फ्लाईंग किसमुळे तरुणाला आता ३ वर्षाचा तुरुंगवास भोगायला लागणार आहे. त्याचबरोबर त्याला दंड सुद्धा ठोठावण्यात आला आहे. सदर घटना ही मुंबईत घडली असून या घटनेने अनेक तरुणांना धडा मिळण्यासारखा आहे. नेमकं काय घडलं ? जाणून घ्या.
एका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमादरम्यान एका तरुणाने १६ वर्षीय मुलीची भर कार्यक्रमात छेड काढली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. या तक्रारीत मुलीने म्हटले की, क्लासला जात असताना शेजारी राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाने तिचा हात पकडला आणि स्वतःकडे खेचलं. त्यानंतर तिचा पाठलाग देखील केला. याबाबतीत सुरुवातीला मुलीने कुटुंबियांना काहीही सांगितले नाही. मात्र हळदी कुंकवाच्या भर कार्यक्रमात तरुणाने तिला फ्लाईंग किस दिली. या घटनेची माहिती मुलीने कुटुंबियांना सांगितली.
मुलीच्या वडिलांनी आरोपीला मुलीपासून लांब राहण्याची समज दिली. मात्र आरोपी आणि त्याच्या कुटुंबाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. परिस्थिती आणखी बिकट झाली आणि कुटुंबाने पोलिस तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. याप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवलं असून तब्बल ९ वर्षांनंतर संबंधित तरुणाला ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आणि ३००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याप्रकरनंतर ९ वर्षांपूर्वीच हे प्रकरण तरुणाच्या चांगलचं अंगलट आल्याचं पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.