इफ्तार पार्टीत सूटमुळे मिळेल परफेक्ट लूक; पाहा सूटचे ८ ट्रेंडी डिझाईन्स

Bharat Jadhav

इफ्तार पार्टीसाठी सूट डिझाईन्स

रमजानचा पवित्र महिना सुरू झाला असून मुस्लीम लोक महिनाभर उपवास करतात. बरेच लोक घरी इफ्तार पार्टी देखील आयोजित करतात. जर तुम्ही घरी इफ्तार पार्टी आयोजित करत असाल किंवा त्यात सहभागी होत असाल तर नवीन काही आधुनिक आणि स्टायलिश सूट परिधान करा जे तुम्हाला एक ग्लॅमरस लूक देतील.

Iftar Party Suit Designs

कॉलर नेक सलवार सूट

इफ्तार पार्टीला तुम्ही कॉलर असलेला हिरवा सलवार सूट घालू शकता. हा सूट साधा आणि सुंदर लूक देईल.

Iftar Party Suit Designs

पर्पल शरारा सूट

स्लीव्हलेस स्टाइल तसेच फूल स्लीव्ह असेलला गोटा पट्टी बॉर्डर पर्पल शरारा सूट जबरदस्त लूक देईल. पार्टीत सर्वांच्या नजरा तुमच्याकडे वळतील.

Iftar Party Suit Designs

काश्मिरी सूट

जर तुम्हाला साधा लूक हवा असेल तर काश्मिरी शैलीचा सिल्क सूट निवडा. हा सूट गळ्यातील डिझाइनमुळे छान दिसतो.

Kashmiri Suit

मिरर वर्क प्लाझो सूट

रंगीत कापडांमधील मिरर वर्क प्लाझो सूटमुळे तुम्ही अधिक आकर्षक दिसाल. हा सूट टेलरकडून शिवून घेऊ शकतो. तसेच दुकानातूनही खरेदी करू शकता. जरी आणि मिरर वर्क पॅटर्नमुळे तुमचे सौंदर्य खुलून दिसेल.

mirror work palazzo suit

ब्लू जॉर्जेट स्वीटहार्ट नेक सूट

जर तुम्हाला हेवी आणि सुंदर डिझाइन असलेला सूट आवडत असेल तर स्वीटहार्ट नेकलाइन असलेला निळा सूट भारी आहे.

मरून घरारा सूट

तुम्ही जड डिझाइन असलेला मरून घरारा सूट देखील ट्राय करू शकता. या घरारा सूटमध्ये समोर सोनेरी जरी डिझाइन करण्यात आलेली आहे. राउंड नेक असलेला सूट तुम्ही पार्टीत परिधान केला तर सर्वजण तुमचं कौतुक करतील.

Maroon Gharara Suit

हेही वाचा

येथे क्लिक करा

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?