हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जिवलग मित्रांनीच तरुणाचा जीव घेतला. चौघांनी मस्करीमध्ये आपल्या मित्राच्या गुप्तांगामध्ये पाण्याचा पाईप टाकला आणि प्रेशरने पाणी सोडलं. पण ही मस्करी या तरुणांना खूपच महागात पडली. या मस्करीच्या नादात त्यांनी त्याच्या मित्राची निर्घृण हत्या केली. तरुणाच्या गुप्तांगाला गंभीर इजा पोहचून त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. या घटनेमुळे हरियाणामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या फरीदाबादमधील सेक्टर ५८ परिसरात ही घडली. मृत तरुणाचे नाव मनोज चौहान असे होते. तो संजय कॉलनीमध्ये राहत होता. मनोजचे चार मित्र अतिंदर, कार्तिक, संदीप आणि राहुल यांनी मिळून १७ मे रोजी सकाळी एका फार्महाऊसमध्ये त्याच्यासोबत क्रूर कृत्य केले. आरोपींनी मस्करीमध्ये मनोजच्या गुप्तांगात पाण्याचा पाईप टाकला आणि आत हाय प्रेशरने पाणी सोडले. या घटनेत मनोजच्या गुप्तांगाच्या आतमध्ये गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मनोजचा भाऊ आनंद चौहान यांच्या तक्रारीवरून सेक्टर ५८ पोलिस ठाण्यात याप्रकरणी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोजच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, १६ मे रोजी रात्री चारही आरोपी आणि मनोज एका लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्वजण आंघोळीसाठी एका फार्महाऊसवर गेले. ही घटना तिथेच घडली. त्यांनी मनोजच्या गुप्तांगात पाण्याचा पाईप टाकून पाणी सोडलं. त्यानंतर मनोजची प्रकृती गंभीर झाली.
मनोजची अवस्था पाहून चौघांनीही सकाळी ९ वाजता त्याला गंभीर अवस्थेत घरी आणले आणि त्याची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगितले. त्यानंतर मनोजच्या कुटुंबीयांना त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान मनोजचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, मरण्यापूर्वी मनोजने त्याच्या भावाला त्याच्या मित्रांनी त्याच्याशी काय कृत्य केले हे सांगितले होते. या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. संदीप आणि राहुल उर्फ कबुतर या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर दोन आरोपी अतिंदर आणि कार्तिक फरार आहेत. पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.