Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Dhanshri Shintre

स्मार्टफोन

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हे जीवनातील अत्यावश्यक आणि सर्वाधिक वापरले जाणारे तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे साधन बनले आहे.

स्फोट होण्याचा धोका

चुकीचा चार्जर वापरल्यास फोन ओव्हरहीट होऊन स्फोट होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे योग्य चार्जर वापरणे आवश्यक आहे.

मूळ चार्जर

स्मार्टफोनचे आयुष्य टिकवण्यासाठी नेहमी मूळ चार्जर वापरून फोन चार्ज करणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रभावी उपाय

नवीन चार्जर घेताना खरा आणि बनावट चार्जर ओळखण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घ्या.

अ‍ॅप इन्स्टॉल करा

सर्वप्रथम, फोनमध्ये भारत सरकारचा BIS अ‍ॅप इन्स्टॉल करून उत्पादनाची खरेदी आधी तपासा.

अ‍ॅप उघडा

इन्स्टॉलेशननंतर अ‍ॅप उघडा, CRS अंतर्गत Verify R no. पर्याय शोधून त्यावर टॅप करा आणि पुढील प्रक्रिया करा.

दोन पर्याय

चार्जर ओळखण्यासाठी अ‍ॅपमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे पर्याय दिसतील, ज्यातून तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता.

चार्जरची खरी माहिती

नोंदणी क्रमांक टाका किंवा QR कोड स्कॅन करून चार्जरची खरी माहिती अ‍ॅपमधून सहज मिळवता येते.

BIS क्रमांक

नोंदणी क्रमांक भरल्यावर चार्जरची श्रेणी, देश, BIS क्रमांक आणि मॉडेल क्रमांकाची संपूर्ण माहिती अ‍ॅपमध्ये मिळते.

उत्पादन क्रमांक

नवीन चार्जर खरेदी करताना लक्षात ठेवा, बॉक्सवर नेहमी उत्पादन क्रमांक आणि QR कोड दिलेला असतो.

NEXT: रिलायन्स जिओचा नवा धमाकेदार प्लॅन, ४० जीबी डेटा आणि मोफत OTT सबस्क्रिप्शन

येथे क्लिक करा