Dhanshri Shintre
जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात मनोरंजनाचा डोज वाढवण्यासाठी जिओने खास ऑफर आणली आहे.
जिओने कोणताही गाजावाजा न करता एकाच वेळी ७ नवीन प्लॅन्स सादर केले असून, यामध्ये ग्राहकांना भरघोस फायदे दिले जात आहेत.
जिओने सादर केलेल्या ७ नवीन प्लॅनपैकी ६ प्रीपेड प्लॅन्स आहेत, जे फ्री कॉलिंग, डेटा आणि ओटीटी सबस्क्रिप्शनसह आहे.
जिओने ३३१ रुपयांचा डेटा व्हाउचर यादीत समाविष्ट केला असून, त्यामध्ये ग्राहकांना भरपूर फायदे आणि विशेष ऑफर्स मिळतात.
जिओचा हा डेटा व्हाउचर ३० दिवसांसाठी वैध असून, या कालावधीत ग्राहकांना एकूण ४० जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे.
या डेटा व्हाउचरची खासियत म्हणजे, जिओ ग्राहकांना ४० जीबी डेटासह डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शनही मोफत मिळत आहे.
जिओचा डेटा व्हाउचर ३० दिवसांसाठी वैध आहे, मात्र यामध्ये मिळणारे डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन पूर्ण ९० दिवसांसाठी उपलब्ध आहे.