Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Bank Minimum Balance Rule: आता ४ बँकांनी आपल्या बचत खात्यावरील नियमांमध्ये बदल केले आहेत. आता तुम्हाला बँकेत सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान बॅलेंस ठेवला नाही तरीही दंड भरावा लागणार नाहीये.
Bank Minimum Balance Rule
Bank Minimum Balance RuleSaam Tv
Published On

बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक खातेधारकांना त्यांच्या अकाउंटमध्ये कमीत कमी पैसे ठेवणे गरजेचे आहे. जर तुमच्या खात्यात तेवढे पैसे नसतील तर तुम्हाला दंड भरावा लागतो. हा दंड वेगवेगळ्या सेव्हिंग अकाउंटवर वेगवेगळी असते.याबाबत काही बँकांनी आता निर्णय घेतला आहे. आता या बँकांनी कमीत कमी बँलेंस ठेवला नाही तरीही कोणताही दंड लागणार नसल्याचे सांगितले आहे.

Bank Minimum Balance Rule
PF चे पैसे काढल्यानंतर पेन्शन मिळणार का? काय आहे नियम, वाचा सविस्तर

इंडियन बँक (Indian Bank)

आता इंडियन बँकेने बचत खात्यावरील कमीत कमी बॅलेंस ठेवण्याच्या सर्व अटी रद्द केल्या आहेत. आता तुम्हाला मिनिमम बॅलेंस न ठेवण्यावर कोणताही दंड द्यावा लागणार नाही. ही नवीन सुविधा ७ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India)

स्टेट बँकेने याआधीच २०२० मध्ये सेव्हिंग अकाउंटवरील कमीत कमी बॅलेंस ठेवण्याची अट रद्द केली आहे. जर तुम्ही खात्यात कमीत कमी बॅलेंस ठेवले नाही तर तुम्हाला कोणताही दंड भरावा लागत नाही.

कॅनरा बँक (Canara Bank)

मे २०२५ मध्ये कॅनरा बँकेत सेव्हिंग अकाउंट्स, सॅलरी अकाउंट आणि एनआरआय अकाउंटवरील अॅव्हरेज मंथली बॅलेंसची अट रद्द केली आहे.

Bank Minimum Balance Rule
८ कोटी EPFO खातेधारकांसाठी खुशखबर, ८.२५ % व्याज जमा, तुमचा बॅलन्स कसा चेक कराल?

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)

आता पंजाब नॅशनल बँकदेखील सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान बॅलेंस न ठेवल्यावर कोणताही दंड आकारणार नाहीये. याआधी पंजाब नॅशनल बँकेत जर कोणत्याही ग्राहकाने कमीत कमी बॅलेंस ठेवला नाही तर जेवढी रक्कम आहे तेवढ्याचा दंड भरावा लागतो. दरम्यान, आता बॅलेंस कितीही असला तरीही त्यांना दंड भरावा लागणार नाहीये.

Bank Minimum Balance Rule
Bank News: आणखी एक बँक मोठ्या बँकेत विलीन होणार; RBI ने दिली मंजुरी, ग्राहकांना दिलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com