अंबरनाथमध्ये हॉटेलचालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलच्या चिमणीच्या वादातून शेजाऱ्याने गुंडांना बोलावून हॉटेलचालकाला मारहाण केली. अंबरनाथच्या भास्करनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून काही जण फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या भास्करनगर परिसरात आरएम टेलर्ससमोर चंद्रकांत गांगुर्डे आणि त्यांचा भाऊ उमेश गांगुर्डे यांचं चायनीजचे हॉटेल आहे. या हॉटेलची चिमणी त्यांनी शेजारच्या गल्लीतून वर काढली होती. यावरून शेजारी राहणारे राकेश गुप्ता यांच्याशी त्यांचे वाद सुरू होते. या वादाचे रूपांतर सोमवारी रात्री हाणामारीत झाले. राकेश गुप्ताने गुंडांना बोलावून हॉटेलचालकाला मारहाण केली.
राकेश गुप्ता आणि त्याचा भाऊ, तसंच संतोष लष्कर, आकाश जगले आणि प्रकाश म्हात्रे यांनी उमेश आणि चंद्रकांत गांगुर्डे या दोघांना मारहाण केली. लोखंडाच्या रॉडने मारहाण झाल्यामुळे उमेश गांगुर्डे याचं बोट फ्रॅक्चर झालं असून त्याच्यावर सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत राकेश गुप्ता आणि त्याच्या भावाला अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे. तर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमी उमेश गांगुर्डे यांनी केली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.