kerala Crime News Saam Digital
क्राईम

Crime News: कर्ज बाजारी झालेल्या इंजीनियरने रचला ६ वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा कट; खंडणीसाठी आलेल्या कॉलच्याआधारे अपहरणाचा उलगडा

kerala Crime News: केरळमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ६ वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केल्याप्रकरणी एका व्यावसायिकासह ,त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आलीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

kerala Crime News

केरळमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ६ वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केल्याप्रकरणी एका व्यावसायिकासह ,त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आलीये. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कर्ज बाजारी झाल्याने रचला अपहरणाचा कट...

सूत्रांनकडून मिळालेल्या माहितीनूसार, व्यावसायाने कंप्यूटर इंजीनियर असलेला आरोपी पद्यकुमार (वय५२) याचे परिसरात केबल नेटवर्कच्या व्यावसायासह अन्य काही व्यवसाय होते. कोविडच्या दिवसांनतंर पद्यकुमार आर्थिक अडचणीत सापडला होता तसचं याच्या कुटुंबावर साधारण ५ करोड रूपयांचे कर्ज होते. ज्यामुळे आर्थिक अडचणीतून लवकर बाहेर पडण्यासाठी पद्यकुमार आणि त्याच्या पत्नी अनीता (४५)तसंच मुलगी अनुपमा(२०) यांनी अपहरणाचा कट रचला.

केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, या अपहरणाची योजना अतिशय बारकाईने करण्यात आली होती. आरोपी पद्यकुमार गेल्या काही काळापासून या अपहरणाची योजना करत होते त्यामुळे अपहरण करण्यासाठी ते लहान मुलांच्या शोधात होते. तंसच पद्यकुमार याची मुलगी सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली कमाई करत होती परंतू काही तांत्रिक अडचणीमुळे तिच्या साहाय्याने मिळणारे पैसेही येणे बंद झाली. त्यानंतर कुटुंबाला गुन्हांच्या गोष्टी पाहून सोप्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार आला.

अपहरणाची तयारी करत असताना पद्यकुमारने आपल्या कारसाठी २ बनावट नंबर प्लेटही बनवल्या होत्या. याआधीही दोनदा पीडित ६ वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता,पण मुलीची आई आणि आजीसोबत असल्यामुळे तो प्रयत्नपण फसला होता..

पुराव्याच्या आधारे आरोपीचा घेतला मागोवा..

चिमुकलीच्या अपहरणाची बातमी शहरभर पोहचली होती. तसंच पोलिसांचे अनेक पथक शहरात आरोपीसंह चिमुकलीचा शोध घेत होते. दरम्यान पकडले जाण्याच्या भीतीने अपहरण केलेल्या चिमुकलीस कोलकत्तामधील एका शेतात टाकून देण्यात आले. चिमुकली मिळाली परंतू पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू ठेवला .

या तपासात अपहरणाच्या खंडणीसाठी आलेल्या कॉलच्या आधारे या आरोपीचा शोध घेण्यात यश आले. पोलिसांनी सांगितले की, खंडणीसाठी आलेल्या कॉलवरील आरोपी पद्यकुमारचा आवाज एका सदस्याने ओळखला आणि त्याने सांगितलेल्या माहितीच्या आधारे आरोपीना पकडण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT