ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डिसेंबरमध्ये थंडी असते. थंडीच्या काळात फिरायला जाण्याची मज्जा काही वेगळीच असते.
डिसेंबर महिन्यात तुम्ही देशातील निसर्गरम्य ठिकाणी नक्की भेट देऊ शकता.
डिसेंबर महिन्यात थंडीत तुम्ही गोव्यातील समुद्रकिनाऱ्याचा अनुभव घेऊ शकता.
बर्फाच्छादित डोंगर पाहण्यासाठी तुम्ही उत्तराखंडमधील औली या ठिकाणी भेट देऊ शकता.
ऋषिकेश हे उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले एक सुंदर शहर आहे. या शहरातून गंगा नदी वाहते. येथे तुम्ही रिव्हर राफटिंगचा अनुभव घेऊ शकता.
जयपूरला पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. जयपूरमधील राजवाडे हे पाहण्यासाठी प्रेक्षणीय स्थळ आहे.
वाराणसी हे खूप सुंदर शहर आहे. येथील घाट आणि मंदिरे पाहणे एक खूप सुंदर अनुभव असतो.
मनाली हे बर्फाच्छादित ठिकाण म्हणून ओळखले जाते. हिवाळ्यात येथे अतिशय सुंदर वातावरण असते.
हिरवीगार झाडी, डोंगर आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही केरळमधील मुन्नार येथे भेट देऊ शकतात.