ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निवडणुकीच्या दरम्यान एक्झिट पोल जाहीर केला जातो. मतदानाच्या दिवशी एक्झिट पोल ठरवला जातो.
गुरुवारी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली.
मतदानानंतर या राज्यांचे एक्झिट पोल जाहीर केले जातात.
एक्झिट पोल हा एक निवडणूक सर्वे आहे. मतदानाच्या दिवशी हा सर्वे केला जातो.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर वेगवेगळ्या सर्वेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्या हजर असतात.
मतदार मतदान करुन आल्यावर त्यांना याबाबत प्रश्न विचारले जातात.
मतदारांनी दिलेल्या उत्तरांवरुन मतदारांनी कोणत्या राजकीय पक्षाला मतदान केले याचा अंदाज बांधला जातो.
या एक्झिट पोलमध्ये फक्त मतदारांचा समावेश केला जातो. कोणत्या मतदारांना प्रश्न विचारला जाईल हेदेखील आधी ठरवले जात नाही.
एक्झिट पोल नेहमी अचुक असतात असे नाही.