ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात पेरूचे अधिक प्रमाणात सेवन केले जाते.
पेरु खायला चविष्ट असतात. त्याचसोबत शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात.
वजन कमी करण्यासाठी पेरु फायदेशीर असतो. पेरुमध्ये फक्त ३०- ६० कॅलरीज असतात.
ज्या लोकांना सतत भूक लागते त्यांच्यासाठी पेरु हा चांगला पर्याय आहे.
मासिक पाळीदरम्यान पेरु खाणे फायदेशीर ठरते. या काळात पेरु खाल्ल्याने वेदना कमी होतात.
पेरुमध्ये जास्त प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी शरीरातील शुगर लेव्हल वाढत नाही.
पेरुमधील अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फायबर हे शरीरातील वाईट कोलेस्टॅल कमी करण्यास मदत करतात.
पेरु नियमित खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
Next: वय वर्ष 53, ऐश्वर्या नारकरच्या अदांसमोर तरुण अभिनेत्रीही फिक्या