dongaon police charged former minster subodh savji of buldhana Saam Digital
क्राईम

Subodh Savji: मुख्य निवडणूक आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी, सुबाेध सावजींवर गुन्हा दाखल

Buldhana Crime News : हा दावा करीत असताना सावजी यांनी देशातील सध्याचे सरकार हे ईव्हीएम मशीन घोटाळा करून महायुती सरकार आणण्याच्या तयारीत असल्याची शंका मतदारांमध्ये असल्याचे म्हटले.

संजय जाधव

ईव्हीएम मध्ये घोटाळा केला तर मुख्य निवडणूक अधिकारी यांचा मर्डर करेल असा इशारा पत्राद्वारे देणा-या माजी मंत्री सुबोध सावजी यांच्यावर बुलढाणा पाेलिस दलाने अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती डोणगाव पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अमरनाथ नागरे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

राज्यासह देशात लोकसभेच्या निवडणुका संपन्न होत आहेत. येत्या 4 जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर हाेणार आहे. महाराष्ट्रा राज्यात 48 लोकसभेच्या जागांपैकी 35 ते 40 जागा या महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा दावा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी नुकताच केला आहे.

हा दावा करीत असताना सावजी यांनी देशातील सध्याचे सरकार हे ईव्हीएम मशीन घोटाळा करून महायुती सरकार आणण्याच्या तयारीत असल्याची शंका मतदारांमध्ये असल्याचे म्हटले. त्यांनी याबाबत निवडणूक आयुक्ताना पत्र पाठविले आहे. त्यात जर ईव्हीएम मशीन घोटाळा झाला तर मी तुमचा मर्डर करेल असे नमूद केले आहे.

दरम्यान सावजी यांच्या पत्राची आणि त्यांच्या माध्यमातील वक्तव्याची पाेलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलिस ठाणे येथे सावजी यांच्यावर (कलम 506 अन्वये) अदखलपात्र गुन्हा नाेंदविल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस अधिकारी अमरनाथ नागरे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra IAS Transfer : ऐन निवडणुकीच्या हंगामात 7 बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Lizard Facts: पाल सलग पळताना का दिसत नाही? थांबत थांबत का पळते?

Love Rashifal: पाच राशींच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव; बायकोशी वाद की रोमांस, जाणून घ्या विवाहितांसाठी कसा असेल दिवस?

Maharashtra Infrastructure: मोदी सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट! दोन रेल्वे मार्गांना मंजुरी; कोणाला होणार फायदा?

Mumbai Gold मेट्रो लाईन: मुंबईहून ४० मिनिटात गाठता येणार नवी मुंबई विमानतळ

SCROLL FOR NEXT