CCTV grab shows attackers chasing and stabbing a 25-year-old man in broad daylight in Delhi’s Mangolpuri area. Saam Tv
क्राईम

दिवसाढवळ्या थरार! ५ जणांनी पाठलाग केला, रस्त्यात गाठून २५ वर्षीय तरुणाला क्रूरपणे संपवलं, हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद

Daylight Murder Caught On CCTV In Delhi: दिल्लीतील मंगोलपुरी परिसरात दिवसाढवळ्या 25 वर्षीय तरुणाची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपी अद्याप फरार आहेत.

Omkar Sonawane

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये गुन्हेगारी काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. भर रस्त्यात खून, हत्या, बलात्कार अशा काही घटना आता राजधानीमध्ये नित्यनियमाने घडत असल्याने रहिवाशांसाह पर्यटकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. आता पुन्हा एकदा भर रस्त्यात एका युवकाचा खून केल्याने दिल्ली हादरली आहे.

भरदिवसा तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर चाकूने सपासप वार करत त्याची हत्या केली गेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून घटनेला एक दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे. यामुळे दिल्ली पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दिवसाढवळ्या चाकूने भोसकत तरुणाची हत्या दिल्लीतील मंगोलपुरीमध्ये बुधवारी संध्याकाळी घडली. चार ते पाच जणांनी मिळून एका 25 वर्षीय मुलाची भोसकून हत्या केली. हल्लेखोरांपासून वाचण्यासाठी हा युवक जोरजोरात किंचाळू लागला आणि त्याने लोकांकडे मदत मागितली. मात्र कोणीही पुढे आला नाही. या नराधमांना कुठलीही भीती नव्हती सगळ्यांसमोर चाकूने सपासप वार करत राहिले.

घरात शिरण्याचा प्रयत्न, पण

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज हादरवून टाकणारा आहे. आजूबाजूला अनेकजण उपस्थित होते. पण तरी देखील एक ही व्यक्ती त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आकाश आहे. चार ते पाच जण आकाशच्या मागे पळत असून त्याच्यावर चाकूने वार करत आहे असे सीसीटीव्हीमध्ये दिसतंय . याच दरम्यान तो आपला जीव वाचवण्यासाठी घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. मात्र बाहेर असलेला व्यक्ती लगेच दार बंद करून घेतो, आकाश गेटला घट्ट धरून ठेवतो आणि मागे असणारे हल्लेखोर त्याच्यावर चाकूने वार करत राहतात. मोठ्या हिमतीने एक वृद्ध व्यक्ती हातात काठी घेऊन येतो तेवढ्यात हे हल्लेखोर तेथून पळ काढता.

हल्लेखोरांना अद्याप मोकाट

आकाश हा दिल्लीतील मंगोलपुरीमध्ये राहत होता. तो गाडीवर सामान विकून आपला उदरनिर्वाह करत होता. दिल्ली पोलिसांनी हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्या मागावर विशेष पथक आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आधीच ढासळली आहे. अशा परिस्थितीत, एका तरुणाचा दिवसाढवळ्या भरवस्तीत खून केला जातो यामुळे दिल्ली पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुतोंडी कृती, एमआयएमसोबत युती? भाजपचा एमआयएमसोबत घरोबा?

Municipal Corporations: राज्यातील १५ महापालिकांमध्ये महिलाराज, कोणत्या महापालिकांमध्ये असतील महिला महापौर?

ठाकरेंची युती धोक्यात? मनसे शिंदेंसोबत गेल्यानं ठाकरे भाजपसोबत?

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा २५ जानेवारी रोजी होणार

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT