Crime News : आरडीचे पैसे भरायला गेले ते परत आलेच नाही, गडचिरोलीतील 'त्या' हत्याकांडाबाबत मोठी अपडेट समोर

Gadchiroli Crime News : गडचिरोली जिल्ह्यातील नागेपल्ली येथील हत्याकांड प्रकरण अहेरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत उघड केले आहे. आरोपीला अटक करून त्याची कबुली घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Crime News : आरडीचे पैसे भरायला गेले ते परत आलेच नाही, गडचिरोलीतील 'त्या' हत्याकांडाबाबत मोठी अपडेट समोर
Gadchiroli Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • गडचिरोलीतील हत्याकांडाचा दोन दिवसांत उलगडा

  • अहेरी पोलिसांनी आरोपीला अटक केली

  • आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली

  • २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर

गणेश शिंगडे, गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या हत्याकांड प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अहेरी पोलिसांनी केवळ दोन दिवसांतच हत्याकांडातील अज्ञात आरोपीचा शोध लावून त्याला अटक केली. नागेपल्ली येथील रविंद्र तंगडपल्लीवार यांच्या खून प्रकरणाचा फरार आरोपी समय्या मलय्या सुंकरीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, रविवारी म्हणजेच १८ जानेवारी २०२६ रोजी रविंद्र तंगडपल्लीवार हे आपल्या पत्नीला प्रगती नागरी पतसंस्था, आलापल्ली येथे आरडीचे पैसे भरून येतो असे सांगून घरातून निघाले होते. संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने रवींद्र यांच्या पत्नीने पोस्टेला पोलीसांकडे तक्रार देऊन त्यांच्याबाबत बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.

Crime News : आरडीचे पैसे भरायला गेले ते परत आलेच नाही, गडचिरोलीतील 'त्या' हत्याकांडाबाबत मोठी अपडेट समोर
Rain Alert : राज्याच्या तापमानात किंचित वाढ, पण 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी, १९ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता आलापल्ली-सिरोंचा महामार्ग क्रमांक ३५३ (सी) वरील नागामाता मंदिराजवळील, जंगल परिसरात रविंद्र यांचे धारदार शस्त्राने डोके, मान आणि चेहऱ्यावर वार करून हत्या झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली. यानुसार अहेरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यांनतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

Crime News : आरडीचे पैसे भरायला गेले ते परत आलेच नाही, गडचिरोलीतील 'त्या' हत्याकांडाबाबत मोठी अपडेट समोर
Crime News : २ मुलांच्या आईचं दुसऱ्यासोबत सूत जुळलं, वैतागलेल्या नवऱ्यानं आयुष्य संपवलं, बीडमधील धक्कादायक प्रकरण

पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या सूचनांनुसार तयार केलेल्या विशेष पथकाने मुखबिरांच्या माहिती व तांत्रिक तपासाच्या मदतीने हा गुन्हा उघड केला. आरोपी समय्या सुंकरी याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दिनांक २१ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांना २८ जानेवारीपर्यंत रिमांड मंजूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com