Crime News : २ मुलांच्या आईचं दुसऱ्यासोबत सूत जुळलं, वैतागलेल्या नवऱ्यानं आयुष्य संपवलं, बीडमधील धक्कादायक प्रकरण

Beed Crime News : बीड जिल्ह्यात पत्नी, तिचा प्रियकर आणि सासूच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित तिघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News : २ मुलांच्या आईचं दुसऱ्यासोबत सूत जुळलं, वैतागलेल्या नवऱ्यानं आयुष्य संपवलं, बीडमधील धक्कादायक प्रकरण
Beed Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • बीडमध्ये कौटुंबिक छळामुळे तरुणाची आत्महत्या

  • पत्नीच्या अनैतिक संबंधांचा आरोप

  • जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीचा दावा

  • पत्नी, प्रियकर आणि सासूविरोधात गुन्हा दाखल

योगेश काशीद, बीड

बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीचा प्रियकर, पत्नी आणि सासूच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून या तरुणाने साडीने गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली असून संबंधित संशयितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हाउसिंग सोसायटी केज येथील मृत आश्रुबा उर्फ उत्तम शिवाजी जाधव यांची पत्नी मनीषाचे केज येथील, मयूर पाटील देशमुख या परजातीच्या एका अविवाहित तरुणाशी मागील एक वर्षापासून अनैतिक सबंध होते. मनीषा हिला तिचा प्रियकर मयूर देशमुख पाटील याने केज येथील धारूर रोड येथे एक खोली भाड्याने करून दिली होती. तिथे मनिषा आश्रुबा पासून झालेल्या दोन मुलांसह तिच्या प्रियकरासोबत राहत होती.

Crime News : २ मुलांच्या आईचं दुसऱ्यासोबत सूत जुळलं, वैतागलेल्या नवऱ्यानं आयुष्य संपवलं, बीडमधील धक्कादायक प्रकरण
School Holiday : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, २३ जानेवारीला शाळांना सुट्टी; जाणून घ्या कारण

मृत आश्रुबा सोमवारी म्हणजेच १९ जानेवारी २०२६ रोजी त्यांची पत्नी राहत असलेल्या धारूर रोड भागातील तिच्या खोलीवर गेले. तेव्हा त्यांना मनिषा आणि तिचा प्रियकर यांनी त्याला धक्काबुक्की करून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच मनिषा आणि प्रियकराने त्याला तेथून हाकलून दिले होते. तसेच त्याला मारहाण करून जीवे मारण्याची देखील धमकी दिली होती.

Crime News : २ मुलांच्या आईचं दुसऱ्यासोबत सूत जुळलं, वैतागलेल्या नवऱ्यानं आयुष्य संपवलं, बीडमधील धक्कादायक प्रकरण
School Closed : ७१ विद्यार्थी, एक शिक्षक अन् चार वर्ग; भंडाऱ्यातील झेडपी शाळेत शिक्षकांची टंचाई; शाळेला ठोकलं कुलूप

यामुळे आश्रुबा यांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि सासू यांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला तसेच पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून, हाउसिंग कॉलनी येथील त्याच्या राहत्या घरी लोखंडी अँगला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृत आश्रूबा जाधव यांचे भाऊ युवराज जाधव यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात मयूर प्रताप पाटील देशमुख, मयताची पत्नी मनिषा जाधव आणि सासू मंगल भारत खाडे यांच्या विरुद्ध २८/२०१६ ॲट्रॉसिटीचे कलम ३(१)(आर),३(१)(एस),३(२)(व्ही ए), ३(व्ही) भा न्या सं १०८,११५(२),३५१(२),३५२,३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com