School Closed : ७१ विद्यार्थी, एक शिक्षक अन् चार वर्ग; भंडाऱ्यातील झेडपी शाळेत शिक्षकांची टंचाई; शाळेला ठोकलं कुलूप

Bhandara ZP School News : ग्रामीण शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या गप्पांदरम्यान ईटान येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक टंचाईमुळे ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. शिक्षक नियुक्ती होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
School Closed : ७१ विद्यार्थी, एक शिक्षक अन् चार वर्ग; भंडाऱ्यातील झेडपी शाळेत शिक्षकांची टंचाई; शाळेला ठोकलं कुलूप
Bhandara ZP School NewsSaam tv
Published On
Summary
  • शिक्षक टंचाईमुळे ईटान येथील शाळा बंद

  • एकाच शिक्षकावर ७१ विद्यार्थ्यांचा भार

  • प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष झाल्याचा आरोप

  • शिक्षक नियुक्ती होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा

शुभम देशमुख, भंडारा

ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर शिक्षकांअभावी शाळा ओस पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. लाखांदूर तालुक्यातील ईटान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये शिक्षकांची तीव्र टंचाई असल्याने संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून प्रशासनाचा जाहीर निषेध केला.

ईटान येथील या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकूण ७१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नियमानुसार या ठिकाणी किमान तीन ते चार शिक्षक असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या येथे केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. एकाच शिक्षकाने चार वर्ग आणि ७१ विद्यार्थ्यांना कसे शिकवावे, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या भविष्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

School Closed : ७१ विद्यार्थी, एक शिक्षक अन् चार वर्ग; भंडाऱ्यातील झेडपी शाळेत शिक्षकांची टंचाई; शाळेला ठोकलं कुलूप
Shocking : ४२ सेकंदाचा व्हिडिओ काढला, सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाराने उचललं टोकाचं पाऊल; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि पालकांनी ३० डिसेंबर २०२५ पूर्वीच संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते. रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्ष कृती झाली नाही.

School Closed : ७१ विद्यार्थी, एक शिक्षक अन् चार वर्ग; भंडाऱ्यातील झेडपी शाळेत शिक्षकांची टंचाई; शाळेला ठोकलं कुलूप
Mumbai Bellasis Bridge : मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबई सेंट्रलमधील 'तो' ब्रिज सोमवारी होणार खुला, वाहतूककोंडी होणार कमी

अखेर प्रशासनाच्या या उदासीन धोरणाला कंटाळून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.जोपर्यंत शाळेत नवीन शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत पाठवणार नाही, असा इशारा ग्रामपंचायत पदाधिकारी व पालकांनी दिला आहे.तर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या पर्यायी व्यवस्थेवर ग्रामस्थांचे समाधान करण्याचा प्रयत्न सुरू असून, लोकसहभागातून आणि प्रशासकीय नियोजनातून हा प्रश्न सोडवला जाईल, अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com