Hotel room hidden camera: तुमच्या हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरा तर लपवलेला नाही ना? छुपा कॅमेरा शोधण्यासाठी वापरा ही ट्रिक

Tricks to find hidden camera: आजकाल हॉटेलमध्ये राहण्याच्या वेळी गोपनीयतेबाबत चिंता वाढली आहे. अनेकदा हॉटेल रूममध्ये लपवलेले कॅमेरे बसवलेले असल्याच्या घटना समोर येतात.
Hotel room hidden camera
Hotel room hidden camerasaam tv
Published On

तुम्हाला फिरायला आवडतं का? या प्रश्नावर अनेकांचं उत्तर हो असंच येतं. फिरायला गेल्यावर आपण सहाजिकच हॉटेलमध्ये राहण्याचा विचार करतो. यासाठी आपण पिकनिकला निघण्यापूर्वीच हॉटेलची माहिती इंटरनेटवर शोधून त्याचं बुकिंग करतो. त्यामुळे आपण हॉटेलमध्ये पोहोचलो की फक्त आराम करण्यावर भर देतो. मात्र पुढच्या वेळी तुम्ही हॉटेलमध्ये थांबणार असाल तर आम्ही सांगत असलेल्या गोष्टीचा नक्की विचार करा.

तुम्ही काहीवेळा ऐकलं असेल की, हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरे बसवलेले असतात. यामुळे आजकाल प्रायव्हसीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उपस्थित होतो. त्यामुळे हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आपण सतर्क राहणं फार गरजेचं असतं. हॉटेलच्या खोल्यांमध्ये लपून बसवलेले कॅमेरे लोकांच्या प्रायव्हसीसाठी मोठा धोका ठरतात. काही वेळा या रेकॉर्डिंगचा वापर ब्लॅकमेलसाठीही करण्यात येतो.

सध्या वापरण्यात येणाऱ्या कॅमेरांचा आकार इतका लहान आहे की, ते लॅम्पमध्ये, अलार्ममध्ये किंवा भिंतीच्या एक छोट्या फटीमध्ये देखील लपवून बसवलेले असतात. हे कॅमेरे ओळखायचे कसे याच्या ट्रीक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Hotel room hidden camera
Nashik Tourism: नाशिकमध्ये फिरायला गेलात? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ५ किल्ल्यांना नक्की भेट द्या

तुम्ही राहत असलेल्या खोलीची नीट तपासणी करा

हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश करताच तुम्ही तुमच्या रूमची नीट तपासणी केली पाहिजे. यामध्ये काही विचित्र वस्तू किंवा फिटिंग्ज दिसतात का ते तपासा. कॅमेरे साधारणपणे अशा ठिकाणी लपवले जातात जी ठिकाणं सहजपणे दिसून येत नाहीत. जसं की, दिव्यांचे फिटिंग, ड्रेसिंग मिरर, स्मोक डिटेक्टर, टीव्ही युनिट किंवा फोटो फ्रेमच्या मागे कॅमेरे लपवण्यात येतात.

खोलीतील इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा वस्तू नीट तपासून पाहा. अशावेळी काही संशयास्पद वाटल्यास जवळ जाऊन त्याची तपासणी करा. तुमच्या मोबाईलचा फ्लॅशलाइट किंवा टॉर्च वापरून पाहा. जर हलका ग्लो किंवा रिफ्लेक्शन दिसलं तर ते कॅमेऱ्याचे लेन्स असू शकतात.

Hotel room hidden camera
Delhi Politics : एक बैठक आणि ८ आमदारांचे राजीनामे; आम आदमी पक्षात नेमकं काय घडतंय? वाचा Inside स्टोरी

स्मार्टफोन आणि वाय-फायच्या मदतीने शोधा कॅमेरे

हॉटेलच्या रूममध्ये लपवलेले कॅमेरे नाईट व्हिजनसाठी इन्फ्रारेड लाईट वापरतात. ते शोधण्यासाठी खोलीतील सर्व लाईट्स बंद करा आणि तुमच्या मोबाईलचा कॅमेरा चालू करा. ज्याठिकाणी कॅमेरा असल्याचा संशय आहे तिथे कॅमेरा फोकस करा. स्क्रीनवर रेड किंवा पर्पल लाईट दिसली तर त्या ठिकाणी लपवलेला कॅमेरा असू शकतो.

Hotel room hidden camera
Viral Video: भारतात राहणाऱ्या विदेशी व्यक्तीने २ महिन्यांनी साफ केला एअर प्युरीफायर, फिल्टरच्या आता जे दिसलं....!

WiFi च्या मदतीने वापर करूनही कॅमेरे शोधता येतात. मोबाईलचं WiFi चालू करून तुमच्या नेटवर्क लिस्ट तपासा. जर त्यात CAM, Device_XX किंवा IPCAM सारखी नावं दिसली तर सावध रहा. खोलीत वायरलेस कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com