Delhi Politics : एक बैठक आणि ८ आमदारांचे राजीनामे; आम आदमी पक्षात नेमकं काय घडतंय? वाचा Inside स्टोरी

Delhi Political News : दिल्लीत राजकारण तापलं आहे. आम आदमी पक्षाच्या ८ आमदारांनी राजीनामा दिला आहे. ८ आमदारांच्या राजीनाम्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal NewsSaamtv
Published On

दिल्ली विधानसभा निवडणुकीआधीच आम आदमी पक्षात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आम आदमी पक्षाच्या ८ आमदारांनी राजीनामा दिला आहे. आठ आमदारांनी शुक्रवारी सायंकाळी एक तासांच्या बैठकीनंतर पक्षाला रामराम करण्याची घोषणा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीआधीच आठ आमदारांच्या राजीनाम्याने आप आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. आठही आमदार पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज होते.

Arvind Kejriwal
AAP MP Join BJP: काँग्रेसनंतर 'आप'ला पंजाबमध्ये मोठा धक्का, खासदार रिंकू यांच्यासह आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश

आम आदमी पक्षाच्या सर्व ८ आमदारांना निवडणुकीच्या एक महिन्याआधी तिकीट कापणार असल्याची माहिती मिळाली होती. तिकीट मिळणार नसल्याने या आमदारांनी मौन बाळगलं होतं. मात्र, निवडणूक जवळ आल्यानंतर या आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाने भाजपवर आरोप केला आहे

Arvind Kejriwal
Delhi Assembly Election: महिलांना महिना २५०० रुपये,५ रुपयांत जेवण, सिलिंडर फ्री; भाजपच्या जाहिरनाम्यात लाडक्या बहिणींना शब्द

अन्ना हजारे यांच्या आंदोलनादरम्यान अरविंद केजरीवाल यांना साथ देणारे त्रिलोकपुरीचे आमदार रोहित कुमार महरौलिया यांनी म्हटलं की, 'तिकीट कापल्यानंतर सर्व आमदार संपर्कात होते. त्यांच्यासोबत चर्चा सुरु होती'. आमदार रोहित यांनी सांगितलं की, 'नाराज आमदारांची शुक्रवारी विधानसभा परिसरात बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर या आमदारांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.

८ आमदारांचा पक्षावर गंभीर आरोप

'आप'ने पक्षाने त्यांची विचारधारा सोडली आहे. त्यामुळे आम्ही वेगळा निर्णय घेतला आहे. मादीपूरचे आमदार गिरीश सोनी यांनीही दुजोरा दिला आहे. सर्व ८ आमदारांनी विचार करून एकाच दिवशी राजीनाम्याची घोषणा केली.

Arvind Kejriwal
Delhi Election 2025 : जाट विरुद्ध जाट, गुर्जर विरुद्ध गुर्जर; महाराष्ट्राची रणनीती दिल्लीतही लागू

८ आमदारांचा राजीनामा

त्रिलोकपुरीचे आमदार रोहित कुमार आणि मोदीपूरचे गिरीश सोनी यांच्या व्यतिरिक्त जनकपुरीचे आमदार राजेश ऋषि, पालमचे भावना गौड, कस्तूरबानगरचे मदनलाल, महरौलीचे नरेश यादव, आदर्शनगरचे पवन कुमार शर्मा, बिजवानसनचे बीएस जून यांनी राजीनामा दिला आहे. पक्षाचा राजीनामा देणारे ८ आमदारांनी अन्ना हजारे यांच्या आंदोलनावेळी अरविंद केजरीवाल यांना साथ दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com