Nashik Tourism: नाशिकमध्ये फिरायला गेलात? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ५ किल्ल्यांना नक्की भेट द्या

Surabhi Jayashree Jagdish

नाशिक जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नाशिक जिल्ह्यातील किल्ले स्वराज्याच्या उत्तर सीमेचं संरक्षण करणारे मजबूत बुरुज होते. सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये वसलेले हे किल्ले मुघल सत्तेला रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले.

साल्हेर किल्ला

साल्हेर किल्ला मराठ्यांच्या ऐतिहासिक विजयासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी मुघलांवर मिळवलेला विजय हा मोकळ्या मैदानातील पहिला मोठा मराठा विजय मानला जातो. इतिहास समजून घेण्यासाठी आणि अभिमानाची जाणीव करण्यासाठी हा किल्ला नक्की पाहावा.

मुल्हेर किल्ला

मुल्हेर हा मुघल आणि मराठ्यांमधील संघर्षाचा प्रमुख केंद्रबिंदू होता. हा किल्ला व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला जात होता. विस्तीर्ण पठार आणि ऐतिहासिक अवशेष पाहण्यासाठी नक्की भेट द्यावी.

रामशेज किल्ला

रामशेज किल्ल्याने मुघलांना अनेक वर्षे झुंज दिली होती. अल्प सैन्य असूनही मराठ्यांनी येथे धैर्य आणि शौर्याचे दर्शन घडवले. स्वराज्याच्या जिद्दीची ओळख करून देणारा हा किल्ला पाहायलाच हवा.

हरिहर किल्ला

कातळात कोरलेल्या सरळ पायऱ्यांमुळे हरिहर किल्ला विशेष ओळखला जातो. शिवकाळात हा किल्ला टेहळणीसाठी महत्त्वाचा होता. रोमांचक चढाई आणि अप्रतिम दृश्यांसाठी हा किल्ला पर्यटकांचा आवडता आहे.

अंजनरी किल्ला

अंजनरी हे भगवान हनुमानांचं जन्मस्थान मानलं जाते. धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्वामुळे हा किल्ला खास आहे. इतिहासासोबत शांतता अनुभवण्यासाठी या ठिकाणी नक्की भेट द्यावी.

नाशिक किल्ल्यांचे धोरणात्मक महत्त्व

हे किल्ले उत्तर भारतातून येणाऱ्या आक्रमणांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जात होते. घाटवाटा आणि व्यापारमार्ग सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. म्हणूनच स्वराज्याच्या संरक्षणात नाशिक किल्ल्यांची भूमिका मोलाची होती.

कोणत्या भाज्यांमध्ये आल्याची पेस्ट वापरू नये?

येथे क्लिक करा