कोणत्या भाज्यांमध्ये आल्याची पेस्ट वापरू नये?

Surabhi Jayashree Jagdish

स्वयंपाक

हिवाळ्यात जेवणात गरम मसाल्यांचा आणि हलक्या फोडणीचा वापर वाढतो, पण काही भाज्यांमध्ये आल्याची पेस्ट घातल्याने तिची मूळ चव बदलते किंवा भाजी कडू, चिवट किंवा उग्र होते.

आल्याची पेस्ट

आलं उष्ण असल्याने काही भाज्यांमध्ये त्याचा वाप ते योग्य बसत नाही. म्हणून काही भाज्यांमध्ये आले टाळायचं असतं, नाहीतर चव बिघडते.

दोडक्याची भाजी

दोडकाची चव गोडसर, मऊ आणि सौम्य असते. यामध्ये आलं घातल्यास त्याची उग्रता चव खराब करते. भाजी थोडी कडवट आणि कोरडीही वाटू शकते.

भेंडीची भाजी

भेंडी ही चिकटपणाची भाजी असल्याने आले घातल्यास ती अजूनच चिकट होते. शिवाय आले भेंडीच्या नाजूक चवीशी नीट मिसळत नाही. त्यामुळे भाजीला विचित्र स्वाद येतो.

वांग्याची भाजी

वांग्याचा स्वाद सौम्य आणि मखमली असतो. आलं घातल्यास वांग्याचं नैसर्गिक गोड-तिखट संतुलन बिघडतं. भाजीला उग्र आणि थोडा कडवटपणा जाणवतो.

पडवळ

पडवळची चव हलकी आणि पचायला सोपी असते. आल्याचा तिखटपणा तिच्यावर जड होऊ शकतो. त्यामुळे भाजी चवीला उग्र लागते.

दुधी भोपळा

दुधी भोपळा हलका, रसाळ असतो. यात आलं टाकल्यास त्याची चव हरवते. भाजी कोरडी आणि तिखटसर वाटते.

Skin care: थंडीमध्ये हात काळे होतायत? या सोप्या टीप्सने त्वचा होईल सॉफ्ट आणि उजळ

येथे क्लिक करा