Surabhi Jayashree Jagdish
हिवाळ्यात वातावरण कोरडे, थंड आणि रफ होत असल्यामुळे त्वचा पटकन कोरडी, काळसर आणि खडबडीत होते. विशेषतः हातांवरचा त्वचेला सर्वात जास्त त्रास होतो, कारण हात सतत पाण्यात, साबणात आणि थंड वाऱ्यात राहत असतात.
हिवाळ्यात हातांचा रंग काळवंडणे ही खूप सामान्य समस्या आहे. पण काही साध्या, घरच्या घरी करता येणाऱ्या टीप्सने हातांचा रंग पुन्हा उजळवता येतो.
थंड पाण्यामुळे त्वचा आणखी कोरडी आणि काळसर दिसते. कोमट पाण्यात हात धुतल्याने त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या उजळ दिसते.
हिवाळ्यात दिवसातून ३-४ वेळा हातांना लोशन किंवा क्रीम लावणं आवश्यक असतं. यामुळे स्किनमध्ये ओलावा टिकून राहिला की काळेपणा कमी होतो. शिया बटर किंवा ग्लिसरीनयुक्त क्रीम उत्तम मानलं जातं.
हातांवर डेड स्किन आणि धूळ जमली की रंग काळा दिसू लागतो. अशावेळी साखर आणि मध किंवा कॉफी आणि ऑईलचा स्क्रब वापरा. याने हातांची त्वचा गुळगुळीत आणि उजळ होते.
नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह ऑइलने मसाज केल्याने त्वचा मऊ होते. रातभर ओलावा टिकून राहतो. सकाळी हात काही प्रमाणात उजळ वाटतात.
थंड वाऱ्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. हातमोजे वापरल्याने हातांना संरक्षण मिळते. याने काळेपणा वाढण्यापासून बचाव होतो.
लिंबाच्या रसामुळे काळेपणा कमी होतो आणि बेसन त्वचेच्या स्वच्छतेसाठी उत्तम मानला जातो. अशावेळी आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरल्यास हात उजळतात.