Bhakri Tips: भाकरी भाजण्यासाठी कोणता तवा वापरावा? भाकऱ्या होतील अगदी मऊ आणि लुसलुशीत

Surabhi Jayashree Jagdish

भाकरी

भाकरी करणं हे कौशल्य मानलं जातं. पण योग्य तवा न निवडल्यास भाकरी नीट जमत नाही.

तवा

जर भाकरी करताना परफेक्ट तवा निवडल्यास भाकरी तव्यावर न चिकटता मऊ आणि मुलायम होते.

अनेक महिलांचा प्रश्न

अशावेळी अनेक महिलांना प्रश्न पडतो की, भाकरी भाजण्यासाठी कोणत्या तव्याचा वापर केला पाहिजे.

बिडाचा तवा

भाकरी चिटकू नये तसंच योग्य पद्धतीने पलटली जावी यासाठी बिडाचा तवा वापरणं फायद्याचं आहे.

तव्याचे फायदे

बिडाचा तवा गॅसवर किंवा चुलीवर ठेऊन एकदा गरम झाला की तो उष्णता बराच वेळ टिकवून ठेवतो. अशावेळी ही उष्णता समान प्रमाणात वितरीत होते.

भाकरीचं शिजणं

भाकरीला योग्य आणि स्थित उष्णता मिळाली की भाकरी चांगली भाजली जाते आणि अजिबात तुटत नाही.

जाड तवा

बिडाचा तवा हा जाड असतो. त्यामुळे भाकरी भाजताना त्यांना एक चांगला आधार मिळतो. भाकरी थापून झाल्यावर तव्यावर ठेवताना किंवा उलटताना तिचा नाजूकपणा तसाच राहतो.

jowar vs bajra bhakari

टिकाऊ

बिडाचे तवे हे फार टिकाऊ असल्याने त्याची योग्य प्रमाणात काळजी घेतल्याने ते पिढनपिढ्या वापरले जाऊ शकतात.

Bhakri Tips: ज्वारीची भाकरी थंड झाल्यावर कडक होतेय? 'या' सोप्या टीप्सने भाकरी होईल अगदी कापसासारखी लुसलुशीत

rice bhakri recipe
येथे क्लिक करा