Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Mumbai Santacruz Crime News : मुंबईतील सांताक्रूझ परिसरात समलैंगिक नात्यातील वादातून तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीनेच चाकूने वार करून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...
Mumbai Santacruz Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • सांताक्रूझमध्ये महिला समलैंगिक जोडप्यातील वादातून हत्या

  • पार्टीदरम्यान झालेल्या भांडणाचे रूपांतर हिंसाचारात

  • छातीत चाकू खुपसल्याने तरुणीचा मृत्यू

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू

मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला समलैंगीक जोडप्यांमध्ये झालेल्या पूर्वीच्या वादातून प्रेयसीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सांताक्रूझ परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे. कमला संजय कांबळे उर्फ प्रीती असे आरोपीचे नाव आहे. मृत तरुणीचे नाव रेश्मा ढोणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझमध्ये रेश्मा आणि प्रीती वास्तव्यास होत्या. दोघीपण एकमेकांना दीर्घकाळापासून ओळखत होत्या. दोघी घरकाम करुन उदरनिर्वाह करत होत्या. प्राथमिक तपासात दोघी रिलेशनशीपमध्ये असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान कमलाच्या घरी पार्टी सुरु असताना रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास दोघींमध्ये जोरदार भांडण सुरु झाल.

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...
Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

रेश्मा तिच्या घरी न येण्यावरुन हा वाद सुरू झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात कमलाने घरात पडलेला चाकू उचलून रेश्माच्या छातीत खुपसला. रेश्माचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांनी जखमी अवस्थेत रेश्माला रुग्णालयात नेले.

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...
Ayodhya News : अयोध्या धाम आणि पंचक्रोशी परिक्रमा मार्गावर ऑनलाईन मांसाहारी फूड विक्रीवर बंदी, नेमकं कारण काय?

मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून कमला कांबळेला ताब्यात घेतले आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत अटक केली. रेश्माच्या मुलाच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com