Delhi News x
क्राईम

गर्लफ्रेंड बोलत नाही म्हणून डोक्यात सनक, घरातून पेट्रोल अन् चाकू आणला; वाढदिवसाआधीच १८ वर्षीय विद्यार्थिनीची हत्या

Delhi News : कॉलेजमध्ये जाणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणीचा खून करण्यात आला. आरोपीने तिची ओळख लपवण्यासाठी पेट्रोल टाकून तरुणीचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिल्लीतल्या मेहरौली येथे घडली आहे.

Yash Shirke

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर एका व्यक्तीने हल्ला केला. तिची हत्या करुन मृतदेहावर पेट्रोल टाकले. मृतदेह जाळून टाकण्याचा प्रकार आरोपीने केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना देशाची राजधानी दिल्लीत घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे दिल्लीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विवेकानंद कॉलेजमध्ये शिकणारी १८ वर्षीय मेहक जैन नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली होती. काही तासांनी मेहकच्या घरी एक फोन गेला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मेहकची हत्या झाल्याचे सांगितले. या प्रकरणातील आरोपी अर्शकृत सिंगला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती समोर आली आहे. मेहकची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

संजय वन पार्कमध्ये मेहक आणि अर्शकृत यांच्यात वाद झाला होता. अर्शकृतने स्कूटरमध्ये चाकू आणि पेट्रोल घेऊन आला होता. त्या दोघांमधील वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात अर्शकृतने मेहकवर चाकूने हल्ला केला. यात मेहकचा मृत्यू झाला. त्यानंतर अर्शकृतने मेहकचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वत:हून पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

काही दिवसांनी मेहक १९ वर्षांची होणार होती. इंग्रजीमध्ये बीए ऑनर्स करत असलेल्या मेहकला कोरियन भाषांतरकार व्हायचे होते. लाजपत नगरमध्ये तिने कोरियन कोर्ससाठी प्रवेश घेतला होता पण तिचे हे स्वप्न अपूर्णच राहिली. मेहकचे वडील दिल्लीतील चांदणी चौकमध्ये कपड्यांच्या दुकानात काम करतात, तिची आई शिक्षिका आहे.

आरोपी अर्शकृत सिंह हा मेहकवर एकतर्फी प्रेम करत होता. ते दोघे एका कार्यक्रमात भेटले होते. कार्यक्रमात ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर अर्शकृतने मेहकला त्रास द्यायला सुरुवात केली. तो मेहकला इतर मुलांशी बोलायला विरोध करायचा, फेक अकाउंट बनवून तिच्यावर पाळत ठेवायचा. संशय आणि राग या भावनेने त्याने मेहकची हत्या केली, असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT