India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

India Population Growth: भारतातील लोकसंख्येची वाढ 'हम दो हमारे दो' ची धोरणापेक्षाही खाली गेलीय. जागितक बँकेनुसार भारताच्या जन्मदर आता १.९८ आहे. तर रिप्लेसमेंट लेवल अंदाजानुसार, २.१ असलं पाहिजे.
India Population
India Population Growthsaamtv
Published On
Summary
  • भारताचा जन्मदर १.९८ वर घसरला आहे

  • रिप्लेसमेंट लेव्हल २.१ पेक्षा कमी दर

  • एक मूल किंवा मूल नको असलेल्या कुटुंबांची वाढती संख्या

  • लोकसंख्या वाढीवर ब्रेक लागल्याचे संकेत

काही दशकाआधी भारताची लोकसंख्या हा चिंतेचा विषय बनली होती. सध्या भारत दुनिया सर्वात जास्त लोकसंख्या असेलला देश आहे. परंत आता वाढत्या लोकसंख्येवर ब्रेक लागल्याचं दिसत आहे. याचा परिणाम पुढील काही वर्षांमध्ये दिसेल. जागतिक बँकेच्या २०२३ च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या वाढ आता 'हम दो हमारे दो' या धोरणापेक्षा मागे पडलीय.

जागतिक बँकेच्या मते, भारतातील जन्मदर आता १.९८ आहे, तर रिप्लेसमेंट लेवलसाठी तो २.१ असावा असे मानले जाते. भारतात, ज्या कुटुंबांना फक्त एकच मूल आहे किंवा ज्यांना मूल नको आहे अशा कुटुंबांची संख्या झपाट्याने वाढलीय. त्याचाच परिणाम आता दिसून येत आहे.

दक्षिण कोरिया, जपान, रशिया, इटली सारख्या देशांमध्ये परिस्थिती खूप बदललीय. येथे जन्मदर बदलण्याच्या पातळीपेक्षा खूपच खाली गेलाय. धक्कादायक आकडेवारी दक्षिण कोरियाची आहे, जिथे जन्मदर आता फक्त ०.७२ वर आलाय. म्हणजेच एका जोडप्याला सरासरी एकही मूल होत नाहीये. याशिवाय, शेजारील देश चीनमध्ये हा आकडा १ आणि जपानमध्ये १.२ आहे. सिंगापूरमध्ये हा आकडा ०.९७ आणि अमेरिकेत १.६२ आणि फ्रान्समध्ये १.६६ आहे. अशाप्रकारे, जगातील बहुतेक मोठ्या देशांचा जन्मदर रिप्लेसमेंट लेवलपेक्षा खाली गेलाय.

सरकारी योजना

जगातील सरासरी जाणून घेतली तर २.२ होता. जे रिप्लेसमेंट लेवलपेक्षा थोडा जास्त आहे. आफ्रिका खंडातील देश आणि पाकिस्तान, बांगलादेश सारख्या देशांमधील जन्मदर रिप्लेसमेंट लेवल खूप जास्त आहे. मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये य घटत्या जन्मदरामुळे बाजारातील असमतोल, मनुष्यबळ कमी होणे आणि वृद्धांची वाढत्या संख्येमुळे चिंता वाढतेय. जापान, रशिया आणि चीन सारख्या देशांमधील सरकार जन्म वाढवा, यासाठी काही योजनांची घोषणा करत आहे. तरीही लोकांना त्यांचे कुटुंब वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाहीये. दक्षिण कोरियामध्ये कुटुंब नियोजनाच्या विषयावर काम करणारे एक वेगळे मंत्रालय आहे.

India Population
जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

का घटलं जन्मदर

तर जपानमध्ये सलग १६ व्या वर्षापासून लोकसंख्या कमी झालीये. म्हणजेच तेथे मृत्यूची संख्या जन्माच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे. तर कमी मुले जन्माला येत आहेत आणि त्याचा थेट परिणाम लोकसंख्येतील घट म्हणून दिसून येत आहे. जाणकारांच्या मते, जगात औद्याोगिककरणाची वाढ झालीय आहे. कृषी क्षेत्राकडून जग औद्याोगिककरणाकडे वळत आहे. तेथे मनुष्यबळ जास्त लागत नाही. त्याचबरोबर शहरी जीवनात वैद्यकीय, शिक्षण आणि जीवनशैलीवरील खर्च वाढला आहे. यामुळे लोक त्यांच्या जीवनशैलीशी तडजोड करू इच्छित नाहीत आणि लोकसंख्या मर्यादित ठेवत आहेत.

India Population
पुस्तक घेऊन परीक्षेला बसा, CBSE चा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

जन्मदर कमी होण्याचे काय आहेत फायदे

सामाजिक शास्त्रज्ञांच्या मते, जन्मदर कमी होण्याचे एक कारण महिलांचे स्वातंत्र्य आहे. ते आधीच्या तुलनेत वाढले आहे. बाळाला जन्म द्यायचा की नाही याचा निर्णय तेही घेतात. तसेच मोठ्या प्रमाणात महिला आता नोकरी करतात. आर्थिक स्वातंत्र्य आणि उच्च शिक्षणामुळे महिलांना काही प्रमाणात स्वायत्तता मिळालीय. यामुळे त्या स्वतःचे निर्णय स्वतःघेत आहेत. त्यामुळे जन्मदर कमी होण्यामागचे तेही कारणे आहे. याशिवाय आणखी एक फायदा म्हणजे लोकसंख्या कमी झाल्यामुळे जन्माला येणाऱ्या मुलांचे राहणीमानही सुधारत आहे. आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे मुलांचे आयुर्मान वाढले आहे. यामुळेही आता लोकांना कमी मुले हवी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com