ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात वातावरण अल्हादायक वाटते, परंतु यासोबत पावसाळा अनेक आजार देखील घेऊन येतो.
पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि निरोगी आरोग्यसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, जाणून घ्या.
हळदीचे दूध हे अँटीसेप्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, पावसाळ्यात याचे सेवन करावे. यामुळे सर्दी आणि इन्फेक्शनपासून संरक्षण होते.
आल्यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म घसा खवखवणे आणि सर्दीपासून संरक्षण करतात.
मध हे एक नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ आहे, जे इन्फेक्शनपासून लढण्यास आणि शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते.
पावसाळ्यात लिंबू हे व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाने चावा. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे संसर्गापासून संरक्षण करतात.