Knee Pain: सतत गुडघे दुखणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सतत गुडघेदुखी

गुडघ्यांमध्ये सतत वेदना होणे हे केवळ वय वाढण्याचा परिणाम नाही. तर कधीकधी ते एखाद्या गंभीर आजाराचे किंवा दुखापतीचे लक्षण देखील असू शकते. यासाठी याचे वेळी कारण जाणून घेणे गरजेचे आहे.

Knee Pain | canva

ऑस्टियोआर्थरायटिस

हा सांध्यातील सर्वात सामान्य आजार आहे, ज्यामध्ये हाडांमधील कुशन झिजायला लागते. यामध्ये वेदनेसोबतच, सूज देखील येऊ शकते.

Knee Pain | yandex

रुमेटॉइड आर्थराइटिस

हा एक ऑटोइम्यून आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती सांध्यांवर हल्ला करते.या परिस्थितीत सकाळी गुडघ्यांमध्ये वेदना आणि सूज जास्त जाणवते.

Knee Pain | yandex

ऑस्टियोपोरोसिस

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे देखील हाडे कमकुवत होतात आणि दुखू लागतात. महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते.

Knee Pain | yandex

लिंगामेंट इंजरी

गुडघ्याच्या आतील लिंगामेंट किंवा कार्टिलेजला झालेल्या दुखापतींमुळे देखील सतत वेदना होऊ शकतात. अशावेळी चालणे, पायऱ्या चढणे किंवा वजन उचलणे कठीण होऊ शकते.

Knee Pain | yandex

लठ्ठपणा

जास्त वजनामुळे गुडघ्यांवर जास्त दबाव येतो, ज्यामुळे सांधे लवकर झिजतात आणि वेदना होतात.

knee pain | yandex

इन्फेक्शन

गुडघ्यांमध्ये बॅक्टेरिया किंवा वायरल इन्फेक्शनमुळे सूज येऊ शकते आणि तीव्र वेदना होऊ शकतात. वेळीच उपचार न केल्यास वेदना वाढू शकतात.

knee pain | ai

NEXT: रोहित शर्माने घेतली ५ कोटींची आलिशान कार; नंबर प्लेट ३०१५ का?

car | instagram
येथे क्लिक करा