Debu Rajan Khan News Saam tv
क्राईम

Debu Khan News: लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल

Debu Khan News: २८ वर्षीय डेबू खानला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करणयात आला आहे.

Vishal Gangurde

दिलीप कांबळे, मावळ

Debu Rajan Khan News:

प्रसिद्ध लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान याच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट हाती आहे. २८ वर्षीय डेबू खानला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करणयात आला आहे. डेबू खान याच्या बहिणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Marathi News)

आर्थिक व्यवहारातून प्रसिद्ध लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खानने २ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. डेबूने शिंदे वस्ती, सोमटणे येथे २ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी जीवन संपवलं होतं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डेबू खान याच्या मृत्यू प्रकरणात पांडुरंग सूर्यवंशी, गणेश वाळुंज, आकाश बारणे आणि माऊली वडेवाले या चौघ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्या मंगळवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बचत गट आणि बँकेचे हप्ते भरण्यासाठी दिलेले पैसे डेबू खानने आरोपींना दिले होते. या चौघांना डेबू पैसे परत मागत होता. मात्र, या आरोपींनी डेबूला पैसे दिलेच नाही. तसेच आरोपींनी दिलेले धनादेशही वटले नाहीत.

डेबू खानने वारंवार पैसे मागूनही त्याला पैसे मिळाले नाही. या आर्थिक व्यवहारातून डेबू खानने दोन ऑक्टोबर रोजी १२ वाजताच्या सुमारास डेबू याने शिंदे वस्ती, सोमाटणे येथे जीवन संपवलं.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू हा आयटी अभियंता होता. डेबू हा सोमटने फाटे या भागात एकटाच राहत होता. त्याने १ ऑक्टोबर रोजी सकाळपासून घराचं दार उघडलं नव्हतं. यामुळे त्याच्या घरमालकाने डेबूच्या भावाशी संपर्क साधला.

त्यानंतर त्याच्या भावाने त्याला फोन केला. मात्र, त्याचा संपर्क झाला नाही. यामुळे भावाने त्याच्या घरी येऊन दार ठोठावलं. पण डेबूने प्रतिसाद दिला नाही. अखेर पोलिसांशी संपर्क साधून घरात शिरकाव केला. तेव्हा डेबूने आत्महत्या केल्याचे आढळून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

SCROLL FOR NEXT