चेतन व्यास
वर्धा : बसने उतरून घरी जातं असलेल्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने कारमध्ये बसवून दारु पाजत दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आर्वी तालुक्यातील एका गावात घडली होती. याप्रकरणी आर्वी पोलिसांत (Police) पीडितेच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील संशयित आरोपीना पुणे जिल्ह्याच्या रांजनगाव परिसरातील (Wardha) कोरेगाव शिवारातून अटक केली. शुभम उर्फ प्रयोग प्रकाशराव पानबुडे व अशपाक अकबर शहा अशी अटक केलेल्या आरोपीची नाव आहे. (Live Marathi News)
पीडिता १३ ऑक्टोबरला सकाळी आर्वी तालुक्याच्या रोहणा येथील महाविद्यालयात गेली होती. तिची प्रकृती खालावल्याने ती पारगोठाण येथे बसने पोहचून घराकडे पायी जात होती. यावेळी कारमधून आलेल्या मुलांनी तिला अडवून धमकावत बळजबरीने कारमध्ये बसविले. तसेच धनोडी येथील धरणाकडे नेऊन तिला दारु पाजत तिच्यावर आळीपाळींने अत्याचार केला. घटनेबाबत तक्रार दिल्यानंतर (Crime News) स्थानिक गुन्हे शाखा व आर्वी पोलिसांच्या पथकाने तपास करुन आरोपीचा यवतमाळ, अमरावती, अकोला येथे जावून शोध घेतला. हे दोन्ही आरोपी चारचाकी वाहनाने पुण्याकडे पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे पोलिस पथकाने पुण्यात शोध घेतला असता ते कंपनीच्या कामाकरिता रांजनगाव परिसरात गेल्याची माहिती मिळाली. लगेच पोलिसांनी या परिसरात जावून तपास केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनेत वापरलेल्या चारचाकी वाहनाने कारेगाव येथे जाळ्यात अडकले.
दोघांनाही आर्वी पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड,राम खोत, मनोज धात्रक, संतोष दरगुडे, राजेश तिवसकर, अक्षय राऊत, विशाल मडावी, रामकिसन कास्देकर, निलेश करडे, राहूल देशमुख, शिवकुमार परदेशी यांनी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.