चेतन व्यास
वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या सेलू येथील कृषी उत्पन्न उपबाजार पेठेतून धान्याची उचल केल्यावरही पैशांची परतफेड न करता जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांसह (Wardha) त्यांचा मुलगा आणि सुनेला ८१ लाख २१ हजार ४३१ रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी (Selu) सेलू पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. किसन नारायण महाजन (रा.आजनसरा) असे आरोपीचे नाव आहे. (Breaking Marathi News)
किसन महाजन याने सेलूच्या कृषी उत्पन्न उपबाजार समितीतून विक्रम विजय जयस्वाल यांच्या पवनसूत ट्रेडिंग कंपनीकडून १ हजार १७२ क्विंटल ९० किलो सोयाबीन, जि. प.चे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल यांच्याकडून १६८ क्विंटल ५९ किलो सोयाबीन आणि विधी विक्रम जयस्वाल यांच्याकडून ८१ क्विंटल ५० किलो तूर खरेदी केली. जयस्वाल परिवाराकडून महाजन याने तब्बल ८१ लाख २१ हजार ४३१ रुपयांच्या धान्यसाठ्याची उचल केली. परंतु, रकमेची पूर्तता न करता जयस्वाल परिवारातील मुलगा, सुनेसह सासऱ्यांची फसवणूक केली.
पोलिसात गुन्हा दाखल
धान्य खरेदी करून त्याची रक्कम न दिल्याप्रकरणी तक्रार विक्रम जयस्वाल यांनी सेलू पोलिसांत दिली. यावरून पोलिसांनी किसन महाजन याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत तपासाला सुरवात केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.