Rajsthan Crime: 
क्राईम

Rajsthan Crime: प्रियकराचं कर्ज फेडण्यासाठी Dating Appवर शोधला दुसरा बॉयफ्रेंड; विश्वास येताच केलं प्रेयसीनं केलं अपहरण, नंतर...

Rajsthan Crime: प्रिया आणि दुष्यंतची प्रेमकहाणी २०१८ मध्ये सुरु झाली होती. प्रिया सेठने टिंडर या मोबाइल डेटिंग अॅपच्या माध्यमातून जयपूरमध्ये राहणाऱ्या दुष्यंतशी मैत्री केली. तीन महिने चॅटिंग केल्यानंतर हे दोघे भेटू लागले. दुष्यंतने प्रियासमोर पैसेवाला असल्याचं दाखवलं होतं. प्रियाला त्याचा विश्वास पटला, आणि तिच्या सैतानी डोक्यात वेगळ्याच प्लान सुरू झाला.

Bharat Jadhav

Dating App Dushant Sharma Case :

सध्या अनेकजण सोशल साईटवरून आपला साथीदार निवडत असतात. त्यासोबत पुढील आयुष्याचे स्वप्न ही रंगवत असतात. अनेकांना जोडीदार मिळतात देखील दोघांमधील गप्पा वाढतात, एकमेकांना शपथ देत भेटण्याचं ठरवतात. परंतु सोशल साईटवर मिळालेला साथीदार हा भक्षक आहे, हे जोपर्यंत कळतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशीच गत जयपूरमधील दुष्यंत शर्मासोबत घडली. सोशल साईटवर प्रेयसी मिळाल्याने तो आनंदी होता, परंतु त्याच प्रेयसीनेच त्याचा जीव घेतला.(Latest News)

२८ वर्षीय दुष्यंत शर्माला एका सोशल साईटवर आवडती प्रेयसी मिळाल्याने तो आनंदित होता. दोघांची आवडीनिवडी सारख्या असल्याने दुष्यंत भलताच खूश होता. प्रिया सेठ नावाच्या मुलीसोबत दुष्यंतने तब्बल तीन महिने सोशल साईटवर चॅटिंग केली. त्यानंतर तिने त्याला भेटायला बोलवलं आणि त्यातच दुष्यंतचा घात झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रिया आणि दुष्यंतची प्रेमकहाणी २०१८ मध्ये सुरू झाली होती. प्रिया सेठने टिंडर या मोबाइल डेटिंग अॅपच्या माध्यमातून जयपूरमध्ये राहणाऱ्या दुष्यंतशी मैत्री केली. तीन महिने चॅटिंग केल्यानंतर हे दोघे भेटू लागले. दुष्यंतने प्रियासमोर पैसेवाला असल्याचं दाखवलं होतं. प्रियाला त्याचा विश्वास पटला आणि तिच्या सैतानी डोक्यात वेगळ्याच प्लान सुरू झाला.

तिने दुष्यंतचं अपहरण करत त्यांच्या घरच्यांकडून खंडणी वसूल करण्याचा प्लान आखला. यात तिने आपला पहिला प्रियकर आणि आणखी एका साथीदाराची मदत घेतली. या तिघांनी दुष्यंतच्या अपहरणाचा प्लान केला. त्यानुसार प्रियाने २ मे २०१८ रोजी दुष्यंतला फोन करुन भेटायला बोलवलं. त्याला जयपूरच्या बजाज नगरमध्ये असलेल्या घरी नेलं. तिथे प्रियकर दीक्षांत कामरा आणि आणखी एक तरुण लक्ष्य वालिया तेथे होता. दुष्यंतला तिथे आणून दुष्यंतच्या आई वडिलांकडे या तिघांनी १० लाखांची खंडणी मागितली.

दुष्यंतचे आई-वडील घाबरले आणि त्यांनी पोलिसांकडे जाण्याऐवजी तीन लाख रुपये गोळा केले आणि ते प्रियाने सांगितलेल्या बँक अकाऊंटवर जमाही केले. मुलाची सुटका होईल या आशाने आई-वडिलांनी पैसे दिले परंतु दुष्यंत घरी आलाच नाही. दरम्यान खंडणी मिळाल्यानंतर दुष्यंतला सोडून द्यायचा यांचा प्लान होता. परंतु प्रिया, दीक्षांत आणि लक्ष्य यांना असं वाटलं की जर दुष्यंतला सोडून दिलं तर हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाईल आणि त्यांना अटक होईल. त्या भीतीने या तिघांनी गळा दाबून दुष्यंतची हत्या केली.

हत्येनंतर त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि दिल्लीतल्या आमेर डोंगररांगामध्ये फेकला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी फ्लॅटही धुऊन टाकला. मात्र पोलिसांनी त्यांना याच फ्लॅटमधून ४ मे २०१८ रोजी अटक केली.

दरम्यान हे प्रकरण २०१८ मध्ये घडलं असून न्यायालयाने या हत्येप्रकरणातील डेटिंग अॅपवरील प्रेयसी प्रिया सेठ आणि तिचा प्रियकर दिक्षांत कामरा आणि लक्ष्य वालिया या तिघांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुष्यंत शर्मा हत्याकांडाची सूत्रधार प्रिया सेठ आहे. तिचा प्रियकर दिक्षांत कर्जबाजारी झाला होता त्यामुळे तिने दुष्यंतला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. दुष्यंत पैसेवाला असल्याचा तिला वाटलं होतं. त्यातून तिने त्याचे अपहरण केलं. खंडणीचे पैसे मिळाल्यानंतर दुष्यत पोलिसात जाऊन तक्रार करेल अशी भीती तिच्या मनात आली त्यानंतर या प्रकरणातील तिघांनी दुष्यंतची हत्या केली. आता या प्रकरणी कोर्टाने या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT