सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास 'शूट अ‍ॅट साईट' ऑर्डर?, राऊत म्हणाले...

'राणा दाम्पत्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण त्यांचं जात प्रमाणपत्र खोटं आहे.'
Kirit Somaiya/ Sanjay Raut
Kirit Somaiya/ Sanjay RautSaam TV
Published On

रुपाली बडवे -

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्यास सीआयएसएफने 'शूट अ‍ॅट साईट'ची ऑर्डर? दिली असून ही ऑर्डर म्हणजे केंद्राचे पोलिस मराठी लोकांना गोळ्या मारणार असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी केलं. तसंच राणा दाम्पत्यावर कारवाई झाली पाहिजे कारण त्यांचं जात प्रमाणपत्र खोटं आहे अशी मागणीही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. अशा प्रकारच्या कामाच्या पद्धती या अतिरेक्यांच्या आहेत. तपास यंत्रणांवरती हल्ला करून त्यांना खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय संजय पांडे (sanjay Pande) हे एक सक्षम अधिकारी आहेत. काल त्यांच्याविरुद्ध जो आरोप झाला खार पोलिस ठाण्यासंदर्भात विशेष करून राणा दांपत्यांच्या संदर्भात केलेले आरोप हे कसे बिनबुडाचे आहेत ते पांडे यांनी दाखवून दिलं असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

राणा दाम्पत्यावर कारवाई झाली पाहिजे कारण त्यांचं जात प्रमाणपत्र (Caste Certificate) हे खोटं आहे असही राऊत म्हणाले. तसंच राज्याचा विरोधी पक्ष हा उघडा पडला आहे. विरोधी पक्षनेते हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अतिशय जबाबदारीने बोललं पाहिजे दुर्दैवाने या सगळ्या चिखल फेकीत विरोधी पक्षनेते देखील सामील झाले असून ते स्वतःवर चिखल उडवून घेत आहेत असा टोलाही राऊतांनी फडणवीसांना (Devendra Fadnavis) लगावला.

हे देखील पाहा -

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या बाबतती सीआयएसएफने (CISF) काढलेल्या ऑर्डर राऊत म्हणाले, केंद्राचे पोलिस हे मराठी लोकांना गोळ्या मारणार असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही काहीही करा आम्ही प्रतिकार करायचा नाही याचा अर्थ स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी माणसावर केंद्रीय पोलीस केंद्राच्या आदेशाने गोळ्या घालणारं, मोरारजी देसाई यांनी हेच केलं होतं. मुंबई केंद्रशासित करण्याचा जो दाव मी म्हणतो तो हाच आहे. मुंबई केंद्रशासित करायची आहे याचं प्रेझेंटेशन किरीट सोमय्या आणि इतर 5 अमराठी लोकांनी गृहमंत्र्यांना सादर केलं आहे आणि त्या संदर्भातल्या या हालचाली सुरू आहेत असा आरोपही राऊतांनी केला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com