MP Crime Saam Tv
क्राईम

MP Crime: 'वडिलांसोबत राहायचं नाही', सुजलेले तोंड अन् हात मोडलेल्या अवस्थेत मुलीची पोलिसात धाव; क्रुरतेचे VIDEO पाहून सगळे हादरले!

Madhya Pradesh Crime News: मध्यप्रदेशात बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुलीने जन्मदात्यासोबत राहायचे नाही असे म्हणत पोलिसात धाव घेतली आहे.

Gangappa Pujari

जगामध्ये बाप- लेकीचं नात हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. असं म्हणतात की वडिलांच्या हृदयात आपल्या मुलींसाठी विशेष स्थान असते. बाप ती जागा कोणाला देत नाही. वडील कधीच आपल्या लेकीला दुःखी पाहू शकत नाहीत. मात्र मध्यप्रदेशात बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुलीने जन्मदात्यासोबत राहायचे नाही असे म्हणत पोलिसात धाव घेतली आहे. यावेळी तिने वडिलांकडून मारहाण होत असल्याचा आरोप करत थेट व्हिडिओही पोलिसांना दाखवले. काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर...

काय आहे संपूर्ण प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण ग्वाल्हेर जिल्ह्यातील जनकगंज पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्वाल्हेर जिल्ह्यामध्ये पित्याच्या क्रूरतेचा संतापजनक प्रकार समोर असून क्षुल्लक कारणावरून आपल्या मुलीला बेल्टने बेदम मारहाण करत असल्याची तक्रार मुलीने केली आहे. यासंदर्भात तिने पोलिसात धाव घेत पित्यावर कारवाई करण्याची मागणी केली. वडिलांनी केलेल्या या मारहाणीची तक्रार मुलीने पोलिसात केली आहे. या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

निर्दयी बापाची लेकीला मारहाण!

वडील मारहण करताना मुलगी ओरडत राहिली आणि दयेची याचना करत होती, मात्र निर्दयी पित्याला दया आली नाही. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुरावा म्हणून मुलीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. तसेच असे अनेक व्हिडिओ असल्याचेही तिने सांगितले. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

पीडित मुलीने सांगितले की, तिच्या वडिलांचे नाव दीपक असून ते दुकान चालवतात. वडीलही आईला मारहाण करायचे, त्यामुळे आईने त्यांना घटस्फोट दिला. घरात आजीही होती, पण काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले. आजीच्या मृत्यूनंतर वडिलांनी तिला आणखी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर पीडितेने सांगितले की, तिला एक लहान बहीण देखील आहे, तिचे वडील तिलाही अशाच क्रूरतेने मारहाण करत आहेत. वडीलांच्या मारहाणीने घाबरलेल्या मुलीने त्यांच्यासोबत राहायचे नसल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

SCROLL FOR NEXT