देवेंद्र फडणवीस यांनी आपला गाशा गुंडाळायला सुरुवात करावी. महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवायला तयार नाही. लाडकी बहीण योजना टर्निंग पॉइंट नाही तर यू-टर्न ठरणार, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रात ज्या प्रकारचं दळभद्री आणि घाणेरडं राजकारण त्यांनी सुरू केलंय त्याचा अंत जवळ आलाय, अशी टीकाही राऊत यांनी केली. ते मुंबईत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचा राज्य चालू होते. शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीने सध्या फडणवीस आणि त्यांचे लोक काम करत आहेत. तीन घाशीराम कोतवाल यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता असून ते सर्व लुटून खात आहेत".
"महाराष्ट्राला शिवसेनेने (Shivsena) तीन मुख्यमंत्री दिले आणि 70 वर्षापेक्षा जास्त काळ याच्यात मुख्यमंत्री होऊन गेले. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल तर तुम्ही या राज्याचे महाराष्ट्राचा महाभारत समजून घ्यावं", अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
"नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करीत आहेत. पण ते 4 राज्यातल्या निवडणुका एकत्र येऊ शकत नाहीत. हिंमत असेल तर झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या 4 राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेऊन दाखवा", असं चॅलेंजही राऊत यांनी दिलं.
"तुम्हाला तुमची लाडकी बहीण योजनेच्या अजून एक हप्ता महिलांना द्यायचा आहे . म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा आहे. त्यामुळेच तुम्ही दोन राज्यांमधील निवडणुका घ्यायला तयार नाही. पण लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट नाही तर यू-टर्न ठरेल", असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.