Crime News : डोंबिवलीत पार्किंगवरुन राडा, एकाचा दुर्दैवी मृत्यू, मानपाडा पोलिसांनी सुरु केला तपास

Dombivli News : पार्किंगच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याने मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख

dombivli crime News : गाडी पार्किंगवरून झालेल्या वादामुळे काही तरुणांमध्ये झालेल्या भांडणात एका ३५ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीतील गोळवली परिसरात घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव बबलू गुप्ता आहे. काही दिवसांपूर्वी पार्किंगच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याने मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या हाणामारीत जखमी झालेल्या बबलू याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान बबलु याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस पोस्टमार्टेम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत.

डोंबिवली पूर्वेतील गोळवली परिसरात बबलू बद्रीनाथ गुप्ता या व्यक्तीचे पेपरचे गोडावून आहे. १३ ऑगस्टच्या रात्री मोहंमद जहागीर नावाचा चालक पेपरने भरलेली पिक अप गाडी घेऊन गोडावून समोर आला. गोडावूनसमोर तीन ते चार दुचाकी उभ्या होत्या. त्यावर काही तरुण बसले होते. चालकाने त्या तरुणांना दुचाकी बाजूला करा मला त्याठिकाणी पिकअप गाडी उभी करायची आहे असे सांगितले . चालक गाडी मागे पुढे करीत असताना तरुणांचा आणि चालकाचा वाद झाला. या वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले. कामगार आणि बबलू गुप्ता हे गोदामा बाहेर आले. तोपर्यंत तरुणाच्या गटाने जवळपास २० पेक्षा जास्त तरुणाना बोलावून घेतले होते. पुन्हा तरुणांच्या टोळक्याने कामगार आणि बबलूला मारहाण केली.या घटनेमुळे घाबरलेल्या कामगारांनी पळ काढला मात्र बबलू तिथेच होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी बबलू गोडावून समोर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळन आला. त्याला रुग्णलायात दाखल केले. उपचारा दरम्यान बबलू याचा मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांनी हाणामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. बबलूचा मृत्यू मारहाणीमुळे झाला आहे का ? यासाठी पोलिस पोस्टमार्टेम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहे. बबलू याच्यावर गॅस सिलिंडरचा बाटला टाकला होता. तो आजारी देखील होता. आत्ता मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी काही तरुणाना ताब्यात घेतले आहे. गाडी पार्किंगच्या वादातून तरुणाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com