IIT Student Detained In Membership Of ISIS Yandex
क्राईम

Shocking News: इसिसमध्ये सहभागी होण्याच्या संशयावरून आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याला अटक; काळा झेंडा आणि ईमेलचा तपास सुरू

IIT Student Detained In Membership Of ISIS: पोलिसांनी आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. कथितरीत्या तो दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Rohini Gudaghe

Guwahati IIT Student Detained

आयआयटी-गुवाहाटीचा एक विद्यार्थी कथितरित्या दहशतवादी संघटना इसिसमध्ये सामील होणार होता. त्याला शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी आसाममधील हाजो येथून ताब्यात घेण्यात आलं ( Crime News) आहे. हा विद्यार्थी मूळचा दिल्लीचा असल्याची माहिती मिळत आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. (Latest Crime News)

आसाम पोलिसांनी आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. तो इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होणार होता, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला (IIT Student) आहे. त्याला शनिवारी (२३ फेब्रुवारी) संध्याकाळी आसाममधील हाजो येथे ताब्यात घेण्यात आलं आहे. इसिस इंडियाचा प्रमुख हरीश फारुकी उर्फ ​​हरीश अजमल फारुकी आणि त्याचा सहकारी अनुराग सिंग उर्फ ​​रेहान यांना धुबरी जिल्ह्यात अटक केल्यानंतर चार दिवसांनी या विद्यार्थ्याला पकडण्यात आलं (Guwahati IIT Student) आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ताब्यात घेतलेला विद्यार्थी हा मूळचा दिल्लीचा असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलंय की, विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची सध्या चौकशी (ISIS) सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी सांगितलं की ईमेल मिळाल्यानंतर या विद्यार्थ्याची चौकशी सुरू करण्यात आली होती. या विद्यार्थ्याने पाठवलेल्या ईमेलमध्ये तो ISIS मध्ये सामील होणार असल्याचा दावा केला होता.

ई-मेल मिळताच आसाम पोलिसांनी आयआयटी-गुवाहाटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. हा विद्यार्थी दुपारपासून बेपत्ता असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याचं समोर (ISIS Black Flag And E Mail) आलं. या विद्यार्थ्याचा शोध पुन्हा घेण्यात आला. सायंकाळी स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला गुवाहाटीपासून 30 किमी अंतरावर असलेल्या हाजो परिसरातून पकडण्यात आलं आहे.

प्राथमिक चौकशीनंतर त्याला एसटीएफ कार्यालयात आणण्यात आलं आहे. पोलीस त्या संशयित ई-मेलच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत. त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत 'कथितपणे ISIS सारखा दिसणारा' काळा झेंडा सापडला (Crime) आहे. संबंधित संघटनांशी व्यवहार करणाऱ्या विशेष एजन्सीकडे हा ध्वज तपासासाठी पाठवण्यात आला आहे. या विद्यार्थ्याकडून इतर काही साहित्यही जप्त करण्यात आलंय. या प्रकरणाशी संबंधितप्रत्येक गोष्टीची चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT