Pune ISIS Terrorist Case: पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचं सातारा कनेक्शन, दुकान लुटून खरेदी केलं बॉम्ब बनवण्याची सामग्री

Terrorists Robbed Shop In Satara: पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे सातारा कनेक्शन समोर आलं आहे. त्यांनी बॉम्ब बनवण्याचे सामान खरेदी करण्यासाठी साताऱ्यातील एक दुकान लुटले होते.
Pune ISIS Terrorist Case
Pune ISIS Terrorist CaseSaam Tv

Akshay Badwe

Pune ISIS Terrorist Satara Conection

पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे सातारा कनेक्शन उघड झाले आहे. दहशतवाद्यांनी साताऱ्यात एक दुकान लुटून त्यातील रकमेतून बॉम्ब बनवण्याचे सामान खरेदी केले (Pune ISIS Terrorist Case) होते. त्यांनी १ लाख रुपये किमतीचे बॉम्ब बनवण्याची सामग्री खरेदी केली होती. (Latest Crime News)

साताऱ्यामध्ये शाहनवाज आलम व मोहंमद साकी यांनी दुकानात लूटमार केल्यानंतर चोरी केलेली रोकड ही दहशतवादी कृत्यासाठी वापरली होती. आरोपींनी तयार करण्यात आलेल्या बॉम्बच्या चाचण्या विविध ठिकाणच्या जंगलात घेतल्याचं आतापर्यंतच्या चौकशीत निष्पन्न झालं (Terrorists Robbed Shop In Satara) आहे. पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे सातारा कनेक्शन असल्याचं स्पष्ट झालं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दहशतवाद्यांनी साताऱ्यातील सोन्याचे दुकान लुटलं

पुण्यातील कोथरूड भागात जुलै २०२३ मध्ये तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मोहंमद युनूस मोहंमद याकूब साकी, मोहंमद शाहनवाज आलम व मोहंमद इम्रान मोहंमद युनूस खान या तीन आरोपींना अटक केली (Terror Funding) होती. दहशतवाद्यांनी टेरर फंडिंगसाठी कशा प्रकारे पैसे जमा केले ? ते पैसे नेमके कोणाकोणाला व कशा प्रकारे दिले गेले, याबाबतचा तपास सुरू आहे.

गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी साताऱ्यातील सोन्याचे दुकान लुटलं (Pune ISIS Terrorist Satara Conection) होतं. या दहशतवाद्यांनी टेरर फंडिंगसाठी एका सोन्याच्या दुकानात लूट केली होती. त्यांनी दुकानातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली होती.

Pune ISIS Terrorist Case
Pune Crime News : पुणे पोलिसांची कर्नाटकात मोठी कारवाई; ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या साथीदाराच्या आवळल्या मुसक्या

एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

दहशतवाद्यांनी ही रक्कम टेरर फंडिंगसाठी वापरली होती, अशी धक्कादायक माहिती एटीएसने केलेल्या तपासातून समोर आली (Pune Crime News) आहे. मोहम्मद इमरान मोहम्मद युनूस खान, मोहम्मद याकूब साकी या २ दहशतवाद्यांना 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी अटक केली होती. आता पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.

Pune ISIS Terrorist Case
Crime News: अनैतिक संबंधांना विरोध केल्यानं सूनेच्या बॉयफ्रेंडनं सासूला संपवलं; ८०० CCTV बघितल्यानंतर धक्कादायक फुटेज समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com