Pune Crime News : पुणे पोलिसांची कर्नाटकात मोठी कारवाई; ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या साथीदाराच्या आवळल्या मुसक्या

Pune Crime News : पुणे ड्रग्ज तस्करीचं कनेक्शन आता कर्नाटकमध्ये पोहोचलं आहे. पुणे पोलिसांनी मोठी छापेमारी करून ड्रग्ज तस्कर पप्पू कुरेशीला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनिया याचा पप्पू कुरेशी हा साथीदार आहे.
Pune Crime News
Pune Crime News Saam Digital
Published On

Pune Crime News

काही दिवसांपूर्वी पुण्यात कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज सापडलं होतं. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी देशभरात छापे टाकले होते. या ड्रग्जचं तस्करीचं कनेक्शन आता कर्नाटकमध्ये पोहोचलं असून पुणे पोलिसांनी मोठी छापेमारी करून ड्रग्ज तस्कर पप्पू कुरेशीला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनिया याचा पप्पू कुरेशी हा साथीदार आहे. त्याला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कुरेशी आणि हैदर शेख हे दोघे मिळून पुण्यातील ड्रग्स बाहेर विक्री करत होते. पप्पू कुरेशी हा ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धूने याच्या होता संपर्कात होता. पुण्यात काही ठिकाणी त्याने ड्रग्स आणि ड्रग्स बनवण्यात येणारी रसायने लपून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime News
ASHA workers Remuneration : आशा सेविकांसाठी खुशखबर! मानधनात झाली भरघोस वाढ

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करून १०० कोटींपेक्षा अधिक अमली पदार्थ जप्त केले होते. ५२ किलो मेफेड्रॉनचा साठाही पोलिसांनी जप्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दरम्यान पुण्यात जप्त केलेल्या अमली पदार्थ प्रकरणातील आरोपी हैदर शेख याला परदेशी नायजेरीयन नागरिकाने एमडी ड्रग्स दिले होते. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथकं रवाना झाली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांची पथकं काही तासातच दिल्लीत पोहचली आणि ४०० किलो अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात ४००० हजार कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

Pune Crime News
Lok Sabha Election 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज निवडणूक लढणार, प्रत्येक गावातून असणार दोन उमेदवार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com