Lok Sabha Election 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज निवडणूक लढणार, प्रत्येक गावातून असणार दोन उमेदवार

Maval Lok Sabha Constituency : मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज हा स्वतंत्र उमेदवार देत असल्याने आता सर्वच पक्षांची गणित बिघडण्याची शक्यता आहे.
maratha community to contest maval lok sabha constituency
maratha community to contest maval lok sabha constituencysaam tv

Maval :

मावळ लोकसभा मतदारसंघात (maval lok sabha constituency) मराठा समाजाकडून उमेदवार देण्याचा निर्णय आज (बुधवार) मराठा समाजाने घेतला आहे. यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात लाेकसभा निवडणूकीत (lok sabha election 2024) महायुती (mahayuvti), महाविकास आघाडी (mahavikas aghadi) आणि मराठा समाजाचे उमेदवार असतील अशी शक्यता सध्या तरी निर्माण झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मावळ तालुका सकल मराठा समाजाची बैठक लाेणावळा येथे झाली. या बैठकीत एकमताने मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक गावातून 2 उमेदवार देण्याची चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली.

maratha community to contest maval lok sabha constituency
Indrayani River Polluted : इंद्रायणी नदी जलपर्णीच्या विळख्यात, बीज सोहळा येऊन ठेपला तरीही प्रशासन ढिम्म

मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड, मावळ, कर्जत मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतदानाचा प्रभाव हा उमेदवारांना दिसून येणार आहे. (Maharashtra News)

मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून उमेदवार देण्यात येणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज हा स्वतंत्र उमेदवार देत असल्याने आता सर्वच पक्षांची गणित बिघडण्याची शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

maratha community to contest maval lok sabha constituency
Lok Sabha Election 2024 : तुमच्यात निवडणूक लढविण्याचा दम नाही का? खासदार धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांना डिवचलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com