Maharashtra Election 2024: तुमच्यात निवडणूक लढविण्याचा दम नाही का? खासदार धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांना डिवचलं

Kolhapur Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदा काहीही ठरलं असलं तरीही लोक दणका देतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त करुन महायुतीचा उमेदवार जिंकणार असे म्हटलं.
dhananjay mahadik challenges satej patil on lok sabha election 2024
dhananjay mahadik challenges satej patil on lok sabha election 2024saam tv

- रणजीत माजगावकर

Dhananjay Mahadik VS Satej Patil:

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची (kolhapur lok sabha constituency) मूळ जागा शिवसेनेची (shivsena) आहे. शिवसेना भरकटलेली दिसते. या जागेवर मागणी करणारं कोणीच दिसत नाही. राष्ट्रवादीकडून (NCP) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आग्रही असताना देखील ही जागा काँग्रेसला (Congress) मिळत आहे. ही जागा काँग्रेसला येत असताना येथील नेत्यांना आपल्या गळ्यातली माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचे काम केले आहे. एवढी चांगली संधी जर मिळत असेल तर तुमच्यात निवडणूक लढविण्याचा दम नाही का? या निवडणुकीत (lok sabha election 2024) तुम्ही का उभारत नाही? असा सवाल खासदार धनंजय महाडिक (MP Dhananjay Mahadik) यांनी आमदार सतेज पाटील (Mla Satej Patil) यांनी केला आहे. (Maharashtra News)

खासदार धनंजय महाडिक म्हणाले जागावाटप हा महाविकास आघाडीचा (mahavikas aghadi) अंतर्गत प्रश्न आहे. गेल्या 25 - 30 वर्षानंतर कोल्हापूर लाेकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला आहे. यामागील षडयंत्र हे सर्वांना माहिती आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक आहेत.

dhananjay mahadik challenges satej patil on lok sabha election 2024
Satara : खासगी बसमधून 96 लाख चाेरणारे दाेघा युवकांना अटक

काॅंग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) आणि प्रियंका गांधी (priyanka gandhi) यांचे निकटवर्ती असणारे बाजीराव खाडे (bajirao khade) हे गेली चार वर्ष मला खासदार तिकीट मिळणार असं मतदार संघात सांगत आहेत. चेतन नरके (chetan narke) यांना देखील महाविकास आघाडीने शब्द दिला होता असे खासदार महाडिक यांनी म्हटलं.

खासदार महाडिक पुढं बाेलताना म्हणाले कोल्हापूर लोकसभा ही मूळ जागा शिवसेनेची आहे. परंतु शिवसेना भरकटलेली दिसते. या जागेवर मागणी करणारं कोणीच दिसत नाही. राष्ट्रवादीकडून शरद पवार हे आग्रही असताना देखील ही जागा काँग्रेसला मिळत आहे. ही जागा काँग्रेसला येत असताना येथील नेत्यांना आपल्या गळ्यातली माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचे काम केले आहे.

dhananjay mahadik challenges satej patil on lok sabha election 2024
Vitthal Rukmini Darshan: विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन शुक्रवारपासून राहणार बंद, जाणून घ्या कारण

एवढी चांगली संधी जर मिळत असेल तर तुमच्यात निवडणूक लढविण्याचा दम नाही का? या निवडणुकीत तुम्ही का उभारत नाही? असा सवाल खासदार महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना केला आहे. ते म्हणाले गेल्यावेळी एक नारा दिला होता आमचं ठरलंय आता म्हणतात जनतेचे ठरलय. हा नेता फसवा आहे जनतेला सगळं कळालेलं आहे. जनतेने काय ठरवलेला आहे हे या निवडणुकीत दिसेल असेही महाडिक यांनी नमूद केले.

दरम्यान भावनिक आव्हान करायचं आणि प्रत्येक वेळी खोटं बोलायचं. ते चांगलं बोलत नाहीत हा त्यांचा दुर्गुण आहे. लोकांना कळून चुकलंय हा कशा पद्धतीने आपणाला गृहीत धरत आहे. यावेळी काहीही ठरलं असलं तरीही लोक दणका देतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त करुन महायुतीचा उमेदवार लाेकसभा निवडणुक जिंकेल असे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

dhananjay mahadik challenges satej patil on lok sabha election 2024
Kolhapur To Tirupati Flight : कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा मार्चअखेर सुरू हाेणार, जाणून घ्या फ्लाईटची वेळ व दिवस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com