ASHA workers Remuneration : आशा सेविकांसाठी खुशखबर! मानधनात झाली भरघोस वाढ

ASHA workers Remuneration News : राज्य सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
money
money Saam Tv
Published On

Asha Workers News In Marathi :

राज्य सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज बुधवारी महत्वाची बैठक झाली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बैठकीत पोलीस पाटील यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. तर यावेळी आशा सेविकांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकारने आशा सेविकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने शासनाच्या निधीतून आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

money
CAA Act : भारताने आतापर्यंत पाकिस्तान, बांगलादेशातील किती लोकांना दिलं नागरिकत्व? समोर आली मोठी आकडेवारी

राज्य सरकारने मानधनात तब्बल ५ हजार रुपयांची वाढ करण्याची मान्यता दिली आहे. मानधनातील ही वाढ नोव्हेंबर, 2023 या महिन्यापासून देण्यात येईल. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200.21 कोटी रुपये इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर 961.08 कोटींच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

money
Cabinet Decisions : एक शहर, एक तालुका, मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावं बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे २६ निर्णय

पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ

राज्य सरकारने राज्यातील पोलीस पाटलांच्याही मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर त्यांना महिन्याला १५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस पाटलांकडून मानधनात वाढ करण्याची मागणी केली जात होती.

पोलीस पाटलांच्या संघटनेंनी मानधनाचा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com