Cabinet Decisions : एक शहर, एक तालुका, मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावं बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे २६ निर्णय

Cabinet Decision News Update : राज्यातील गावागावात जबाबदारी पार पडणाऱ्या पोलीस पाटील यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार मानधन मिळणार आहे.
Cabinet Meeting
Cabinet MeetingSaam TV
Published On

Cabinet Meeting News :

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाच झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील गावागावात जबाबदारी पार पडणाऱ्या पोलीस पाटील यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार मानधन मिळणार आहे.

अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पुणे जिल्ह्यातील एका तालुक्याचं देखील नाव बदलण्यात आलं आहे.

याशिवाय राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार असल्याचा महत्त्वाची निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर (मराठी भाषा विभाग)

  • पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार (गृह विभाग)

  • अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता (सामान्य प्रशासन विभाग)

  • केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्याला मान्यता (नगरविकास विभाग)

Cabinet Meeting
MNS Politics : राजसाहेब २५ वर्षात बोलले नाहीत, मात्र अमित ठाकरे बोलले; वसंत मोरे राजीनामा दिल्यानंतर झाले व्यक्त
  • श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार (सार्वजनिक बांधकाम विभाग)

  • कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प (मदत व पुनर्वसन)

  • भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज (वित्त विभाग)

  • राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ (आरोग्य विभाग)

  • महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार . नफ्यात आणणार (दुग्धविकास विभाग)

  • मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार (जलसंपदा विभाग)

  • मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार (जलसंधारण विभाग)

  • शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता २५ हजार रुपये अनुदान संस्थाना. (महिला व बालविकास)

  • मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले (वैद्यकीय शिक्षण)

  • आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार (कौशल्य विकास)

  • कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार. (ऊर्जा विभाग)

  • शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता (ऊर्जा विभाग)

  • पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार (पशुसंवर्धन व दुग्धविकास)

  • पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता (महसूल विभाग)

  • म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन (वैद्यकीय शिक्षण विभाग)

  • आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ (सार्वजनिक आरोग्य विभाग)

Cabinet Meeting
Maharashtra Loksabha Election : महाविकास आघाडीतील कोणता पक्ष, कुठून लढणार? शरद पवारांनी थेट माहितीच दिली
  • मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार (परिवहन विभाग)

  • मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता (नगरविकास विभाग)

  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते (ग्रामविकास विभाग)

  • भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन (महसूल व वन विभाग)

  • जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता (परिवहन विभाग)

  • दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना (पशुसंवर्धन व दुग्धविकास)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com