मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन (Ujjain) जिल्ह्यातील तराना गावात यात्रेतून घरी परतणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणावर शुक्रवारी रात्री उशिरा तीन जणांनी अचानक हल्ला केला. तरुणाला काही समजण्याआधीच हल्लेखोर तरुणांनी चाकू काढून त्याच्यावर हल्ला (Youth Killed In Knife Attack) केला. यामध्ये या अल्पवयीन तरूणाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच तरणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पोहोचले तेव्हा घटनास्थळी अतिशय भीषण दृश्य होते. घटनास्थळी सुमारे ६०० फूट रस्त्यावर रक्त पसरले (Madhya Pradesh Crime) होते.पोलिसांनी मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना तरणा येथील एसडीओपी भविष्य भास्कर यांनी सांगितलं की, बगोडा गावात राहणारा १७ वर्षीय अल्पवयीन तरुण तरणा येथे सुरू असलेली तिळभंडेश्वर यात्रा पाहण्यासाठी (Crime News) गेला होता. तेथून तो रात्री उशिरा घरी परतत असताना हनुमान टेकरी तिराहा येथे तीन अज्ञातांनी त्याला अडवले. तयांच्याशी वाद घातल्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला केला.
याप्रकरणी तरूणाने जीव वाचविण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी सुमारे सहाशेफुटांपर्यंत या तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर चाकूने वार करून त्याचा निर्घृण खून (Madhya Pradesh Crime News) केला. घटनेची माहिती मिळताच तरणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
ही हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती टीव्ही नाईन हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत आहे. परंतु , आरोपींनी कोणत्या कारणावरून तरुणाची हत्या ( Knife Attack) केली, याचा कारण अद्यापही पोलिसांना समजू शकलेलं नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलीस कसुन चौकशी करत आहेत.
जुन्या वैमनस्यातून किंवा प्रेमप्रकरणातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज व्यक्त केला आहे आहे. मात्र हत्येचे मुख्य कारण हे अजून गुलदस्त्यातच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.